नोकरनाही स्वाध्याय

नोकरनाही स्वाध्याय

नोकरनाही स्वाध्याय

नोकरनाही स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करा. 

1) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. 

उत्तर :

बरोबर


2) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 

उत्तर :

चूक 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) देशातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 


प्रश्न. 2. पुढील विधाने स्पष्ट करा. 

1) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे. 

उत्तर :

अनेक दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत. निर्णयप्रक्रियेत त्याचा सहभाग वाढावा, या हेतूने सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण राबवले जाते. कारण समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते, तसेच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते. 


2) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 

उत्तर :

दर पाच वर्षानी निवडणुका होतात. निवडणुकांनंतर सरकार बदलू शकते; पण सरकार बदलले तरी नोकरशाही मात्र कायमस्वरूपी असते. नोकरशाहीला प्रत्येक सरकारच्या काळात काम करावे लागते. प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे राबवावी लागतात. ही सर्व कामे कोणत्याही एका राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांकडून होत नाहीत; म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 


प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दांत लिहा. 

1) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर :

मंत्री व त्या खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात, यावरही त्या त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. निर्णय मंत्री घेतात, पण निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक देतात. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना माहिती असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद साधल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होतो. 


2) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीने धोरणांच्या अंमलबजावणीतून अनेक बदल सामान्य नागरिपर्यंत आणले आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. 

स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी योजना इ. बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते; म्हणून नोकरशाहीमुळे राजकीय व्यवस्थेला स्थैर्य लाभते. 


प्रश्न. 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :


प्रश्न. 5. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीचे स्वरूप पुढीलप्रमाणे - 

कायमस्वरूपी यंत्रणा : कर गोळा करणारी, पर्यावरणरक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, समाजाला सुरक्षा देणारी नोकरशाही सातत्याने काम करत असते. दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येते, पण नोकरशाही बदलत नाही. 

राजकीयदृष्ट्या तटस्थ : कोणत्याही पक्षाचे सरकार येवो; त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने तटस्थपणे, कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घेऊ नयेत. सरकार बदलल्यास पहिल्या सरकारची धोरणे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

अनामिकता : एखाद्या धोरणाच्या यश किंवा अपयशाला नोकरशाही थेटपणे जबाबदार नसते, तर ती जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्याची असते. सनदी सेवकावर जाहीरपणे टीका होत नाही. खात्याच्या गैरकारभारासाठी संसद मंत्र्यांला जबाबदार धरते. याची पूर्ण जबाबदारी मंत्री घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात.      

Previous Post Next Post