मानवी वस्ती स्वाध्याय

मानवी वस्ती स्वाध्याय

मानवी वस्ती स्वाध्याय

मानवी वस्ती स्वाध्याय इयत्ता दहावी



प्रश्न १. अचूक पर्यायांस समोरील चोेकटीत ✓ अशी खूण करा. 

अ ) वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. 

i) समुद्रसान्निध्य 

ii) मैदानी प्रदेश

iii) पाण्याची उपलब्धता   ✓

iv) हवामान 


आ) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ?

i) केंद्रित     ✓

ii) रेषाकृती

iii) विखुरलेली

iv) ताराकृती 


इ ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो. 

i) नदीकाठी 

ii) वाहतूक मार्गाच्या लगत

iii) डोंगराळ प्रदेश    ✓

iv) ओेेदयोगिक क्षेत्रात

 

ई ) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. 

i) वनाच्छादन 

ii) शेतीयोग्य जमीन   ✓

iii) उंचसखल जमीन 

iv) उद्योगधंदे


उ ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते ?

i) पारा    ✓

ii) आमापा

iii) एस्पिरितो सांन्तो

iv) पॅराना 



प्रश्न २. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. 

उत्तर :

i) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.

ii) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.

iii) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.


आ ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. 

उत्तर :

i) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.

ii) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.

iii) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.


इ )  भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. 

उत्तर :

i) भारत देश विकसनशील आहे. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केल्याने अनेक नवीन उद्योगधंदे भारतात विकसित झाले आहे. 

ii) ज्या ज्या भागात उद्योगधंदे स्थापन झाले तिथे रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले. तो भाग दाट लोकवस्त्याचा झाला. 

iii) नगराचे रूपांतर महानगरात झाले. लोकांच्या सुखसुविधा वाढल्या, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले. त्याचा प्रभाव ग्रामीण भागावर पडल्याने ग्रामीण लोकचेही राहणीमान सुधारले, त्याच्याही सुख - सुविधेच्या मागणीत वाढ झाली. तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, कॉलेजेस, नवनवीन फ्लॅट सिस्टीम सुरू झाल्याने ते शहरांशी जोडल्या जाऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागाचे शहरात रूपांतर होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच नागरीकरणाला सुरुवात झाली. अशाप्रकारे भारतात नागरीकरण वाढत आहे.  


ई ) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. 

उत्तर :

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. 

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.


उ ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे. 

उत्तर :

i) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे. 

ii) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. 

iii) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले. 


प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा 

अ ) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. 

उत्तर :


 भारतातील नागरीकरण 

 ब्राझीलमधील नागरीकरण

 

i) भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. 

iii) भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दखिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. 

iv) गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.  

 

i) ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. 

iii) ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. 

iv) सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 


आ ) गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझाॅन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. 

उत्तर :


 गंगा नदीचे खोरे

 ॲमेझाॅन नदीचे खोरे

 

1. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. 

2. गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे. 

3. गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे. 

4. यमुना, चंबल, बेटवा, केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत.   

 

1. ॲमेझाॅन नदी पेरू देशातील ॲडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर उगम पावते. 

2. ॲमेझाॅन नदीची एकूण लांबी ६४०० किमी आहे. 

3. ॲमेझाॅन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 200000 क्युसेक एवढा आहे. 

4. निग्रो, जापुरा, झिंग इत्यादी ॲमेझाॅन नदीच्या उपनद्या आहेत.  


इ ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते ?

उत्तर :

i) मानवी वस्ती म्हणजे एखाद्या भूप्रदेशात मानवाने तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वस्तिस्थान होय. निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. 

ii) पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. दैनंदिन वापराबरोबर शेती, उद्योग, प्राणी यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृतीचा उदय व विकास नद्यांकाठी झाला. आजही नदी, तलाव, सरोवर, धरणांच्या परिसरात मानवी वस्ती विकसित झालेली दिसून येते. 

iii) मासेमारी करणारे मानवी समूह संगरकिनाऱ्यावर, नदीकाठी स्थायिक झाले. खाणकाम करणाऱ्यांना खाणीजवळ व कारखान्यातील कामगारांना ओेेदयोगिक क्षेत्राजवळ कायमचे वास्तव्य करणे आवश्यक असते. त्यामुळे जगात सर्वत्र स्थायी वस्त्या निर्माण झाल्या. 

iv) सुपीक जमीन व सपाट मैदानी प्रदेशात शेती, उद्योगधंदे वाहतूक यांचा चांगला विकास होतो त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्येत वाढ होईल. लोकसंख्येत वाढ होणे म्हणजे वस्त्यांची वाढ होणे. 

वरील सर्व कारणांमुळे मानवी वस्त्यांची वाढ अशा विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.                                                                                                                                                 

Previous Post Next Post