अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी स्वाध्याय
प्रश्न १ गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
अ ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण ...........
उत्तर : भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण प्रचंड लोकसंख्या
आ ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ................. व्यवसायावर अवलंबून आहे.
उत्तर : ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
इ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ................ प्रकारची आहे.
उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसिनशील प्रकारची आहे.
प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे.
उत्तर :
i) ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
ii) ब्राझीलच्या पश्चिम भागात अँमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.
iii) या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
iv) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.
आ ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?
उत्तर :
भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य -
i) भारताला एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशालाही ७४०० किमी लांबीचा सागरकिनार लाभला आहे.
ii) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ब्राझीलमध्येही मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशात रोजगारनिर्मिती व परकीय चलन प्राप्त कर लाठी मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो.
iii) भारतामध्ये मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येही मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे.
भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक -
भारत | ब्राझील |
i) भारताला ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ii) भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे. iii) भारतामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो. iv) भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागांना सागरी किनारा लाभला आहे. | i) ब्राझीलला भारतापेक्षा कमी म्हणजे ७४०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ii) ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे. iii) ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते. iv) ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे. |
प्रश्न ३. कारणे सांगा.
अ ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर :
i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस किमी आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७, २६३ चौरस किमी आहे.
ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
आ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर :
i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते.
ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न ४. पुढील आलेखच अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा.
उत्तर :
विश्लेषण -
i) भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. परंतु भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
ii) एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे योगदान - भारतात प्राथमिक व्यवसाय हे साधारणत: सारखेच आहेत. तर तृतीयक व्यवसायातून भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त उत्पन्न प्राप्त होते.
iii) विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी - भारतात प्राथमिक व्यवसायावर जास्त प्रमाणात लोक अवलंबून आहेत. त्यामानाने ब्र झीलमध्ये प्रमाण कमी आहे. द्वितीय व्यवसाय करणारे लोक दोन्ही देशात सारखेच आहे. तर तृतीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे.