सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय इयत्ता दहावी





 

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. शेतकरी चळवळीची ........... ही प्रमुख मागणी आहे. 

उत्तर : शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे. 

2. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी .............. करण्यात आली. 

उत्तर : शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली. 



२. संकल्पना स्पष्ट करा. 

1. आदिवासी चळवळ

उत्तर :

i) आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे.

ii) ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोंड, संथाळ, मुंडा यांसारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते.

iii) स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. 

iv) वनजमिनींवरील त्यांचे हक्क, वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत.


2. कामगार चळवळ

उत्तर :

i) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.  

ii) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.  

iii) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली.  

iv) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.



३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. 

उत्तर :

i) पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताचीच नव्हे, तर जागतिक समस्या बनली आहे. 

ii) पर्यावरणाचा न्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी बासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या,

iii) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत.

iv) 'चिपको' सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, 'नमामि गंगे' सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.


2. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. 

ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बाली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान समेसारख्या संघटना स्थापन झाल्या.

iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. 

iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.



४. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण -

i) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. 

ii) सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.

iii) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.

iv) शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात.

लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.


2. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. 

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण -

i) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.

ii) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.

iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.


3. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण -

i) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.

Previous Post Next Post