मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी
१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1. महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार ............. यांना मानतात.
उत्तर : महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.
2. बाबुराव पेंटर यांनी ............. हा चित्रपट काढला.
उत्तर : बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला.
ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
1. रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
2. टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
3. साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
4. एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
उत्तर :
चुकीची जोडी : एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
दुरुस्त जोडी : एकच प्याला - राम गणेश गडकरी
२. पुढील तक्ता पूर्ण करा.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
|
|
|
|
|
|
टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाट्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरण पर काव्यरचना गायली जाते. |
कीर्तन करतांना कीर्तनकारांना पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष दयावे लागते. त्याच्या अंगी बहुशृतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. |
नाट्य प्रवेशाप्रमाणे लळित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात. लळिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव-देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे मागतात. |
पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते. हे एक रूपकात्मक गीत असते. यामध्ये विविधता, नाट्यात्मता, विनोद आणि गेयता असते. |
|
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा।। रवा - संत तुकाराम |
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला - संत गाडगे महाराज |
ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो। सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो। आपापसांतले कलह लळितात मिटोत। कोणाच्याही मनात। किल्मिष न उरो। निकोप मनाने व्यवहार चालोत। सदाचरणाने समाज वागो। |
अग, ग.. विंचू चावला देवा रे देवा.. विंचू चावला आता काय मी करू.. विंचू चावला - संत एकनाथ |
३. टिपा लिहा.
1. मनोरंजनाची आवश्यकता.
उत्तर :
i) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते.
ii) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते.
iii) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
iv) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.
2. मराठी रंगभूमी.
उत्तर :
i) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे 'मराठी रंगभूमीचे जनक' होत.
ii) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
3. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.
उत्तर :
४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
उत्तर :
i) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.
ii) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.
iii) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.
iv) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते.
एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.
2. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
उत्तर :
i) संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.
iii) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.
व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे.
उत्तर :
i) भारतात चलत्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला.
ii) १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला.
iii) दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला.
iv) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.
अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.
2. पोवाडा म्हणजे काय, हे स्पष्ट करा.
उत्तर :
i) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय,
ii) पोवाडा हा गदय-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
iii) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
iv) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.
v) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.
vi) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.