भूमी उपयोजन स्वाध्याय

भूमी उपयोजन स्वाध्याय

भूमी उपयोजन स्वाध्याय

भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा. 

1) खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. 


2) केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे.


3) नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 


4) ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबाराचा (७/१२) उतारा दिला जातो.


5) ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते.


6) उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

उतारा क्रमांक ७ हे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायदयातील विशेष कलमे आहेत.


7) उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

कारण उतारा क्रमांक १२ मुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे, हे समजते. हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.


प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

उत्तर :

कारण i) नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. 

ii) या लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यशासन किंवा केंद्रशासन करते, या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदा. रुग्णालय, टपाल कार्यलय, पोलिस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. या सेवासुविधांमुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण शमला जातो. त्यामुळे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.


2) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते.

उत्तर :

कारण शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा, दस्त ऐवज नगरभूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते. सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्र. कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी.


3) भूमी उपायोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

उत्तर :

कारण विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते. म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.


प्रश्न. 3. उत्तरे लिहा.

1) ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ?

उत्तर :

i) ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. 

ii) शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात. 

iii) ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. तेथे शेतीसाठी जास्त जमिनीची उपलब्धता असते. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते. 


2) भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा ?

उत्तर :

भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. त्यात ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक व नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक असे प्रकार पडतात.

i) ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक - यामध्ये हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण यांचा समावेश होतो.

ii) नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक - यामध्ये भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतुक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यांचा समावेश होतो.


3) ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

ग्रामीण भूमी उपयोजन

नागरी भूमी उपयोजन 

 

i) ग्रामीण भागात शेतीसाठी भूमीचा वापर केला जातो.

ii) ग्रामीण भागात लोकसंख्येच्या मानाने जमिनीची उपलब्धता जास्त असते.

iii) ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान/माळरान असे करता येते.

 

i) नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. 

ii) नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते.

iii) नागरी भागातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजनाची ठिकाणे असे करता येते.


4) सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा..

उत्तर :

सातबारा उतारा

मिळकत पत्रिका 

 

i) गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो.

ii) हा उतारा शासकीय अभिलेखा महसूल विभागातर्फे दिला जातो. 

iii) या उताऱ्यामध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जाचा बोझा, शेतजमिनीचे हस्तांतरणं, त्यातील पिकांखालील क्षेत्र यांचा समावेश असतो.

 

i) बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते.

ii) ही पत्रिका नगरभूमापन विभागातून मिळते.

iii) मिळकत पत्रिकेत सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती असते.

Previous Post Next Post