प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी
१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1. भारतातील पाहिजे इंग्रजी वर्तमानपत्र ............... यांनी सुरू केले.
उत्तर : भारतातील पाहिजे इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले.
2. दूरदर्शन हे .............. माध्यम आहे.
उत्तर : दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम आहे.
ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
1. प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
2. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
3. दीनबंधू - कृष्णराव भालेकर
4. केसरी - बाळ गंगाधर टिळक
उत्तर :
चुकीची जोडी : प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
दुरुस्त जोडी : प्रभाकर - भाऊ महाराज
२ . टिपा लिहा.
1. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य.
उत्तर :
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले
i) लोकजागृती, लोकशिक्षण यांबरोबरच भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.
iii) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले.
iv) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
2. प्रसारमाध्यमांची आवश्यकता.
उत्तर :
प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते -
i) प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते.
ii) प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो.
iii) प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते.
iv) प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत.
3. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.
उत्तर :
मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात.
i) वृत्तपत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात.
ii) तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते.
३ . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
उत्तर :
i) प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते.
ii) ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
iii) प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात.
iv) जर्मनीतील 'स्टर्न' साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
उत्तर :
i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.
ii) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.
iii) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरांतून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.
iv) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
3. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
उत्तर :
i) दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे दाखवायला सुरुवात केली.
ii) दूरदर्शन या प्रसारमाध्यमांमुळे जग जवळ आले आहे. जगातील घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर पाहता येतात.
iii) या प्रसारमाध्यमांमुळे मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे कार्यही दूरदर्शन प्रभाविपणे करते. लोकसंख्या, हुंडाबळी, वृक्षारोपण, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती यासारख्या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
४. पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आकाशवाणी : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये 'इंडिय " ब्रॉडकास्टिंग कंपनी' (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (एआयआर) असे झाले.
भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार 'आकाशवाणी' हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि सुरु स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. 'विविधभारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरु झाल्या आहेत. उदा. रेडिओ मिर्ची.
1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते ?
उत्तर :
आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते ?
2. IBC चे नामकरण काय झाले ?
उत्तर :
IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम 'इंडियन स्टेट ब्रॉड कास्टिंग सर्व्हिसेस कंपनी' (ISBS) असे नामांतर केले व नंतर 'ऑल इंडिया रेडिओ (ए.आय.आर.)' असे नामकरण केले.
3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात ?
उत्तर :
विविधभारतीवरून २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात.
4. आकाशवाणी हे नाव कसे पडले ?
उत्तर :
ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सुचनेवरून ऑल इंडिया रेडिओला 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले.
५. संकल्पनाचित्र तयार करा.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
|
|
|
|
सुरुवात / पार्श्वभूमी |
भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर वर्तमानपत्रे सुरू झाली. पहिले इंग्रजी वर्तमानपत्र २९ जानेवारी १९८० रोजी सुरू झाले. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 'बेंगॉल गॅझेट' या नावाने वर्तमानपत्र सुरू केले. |
स्वातंत्र्य कालखंडात १९२४ मध्ये एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू केले. |
१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'दिल्ली दूरदर्शन केंद्राचे' उद्घाटन केले. |
माहितीचे / कार्यक्रमांचे स्वरूप |
मुखत: बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर या द्वारे माहिती मिळते. |
शासकीय व उपक्रमांची माहिती, मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधन करणारे व साहित्यिक कार्यक्रम सादर केले जातात. |
रंजक मालिका जगातील विविध घटना, पसिद्ध लोकांच्या मुलाखती, नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ठिकांणाची माहिती याद्वारे सादर केली जाते. |
कार्ये |
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. तसेच तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करते. स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करते. चालू घडामोडींच्या नोंदीची माहिती वर्तमानपत्रातून मिळते. हे मनोरंजनाचे ही एक माध्यम आहे. |
आकाशवाणी तर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. तसेच शेतकरी कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारीत केले जातात. |
दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम आहे. त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे थेट प्रसारण केले जाते. तसेच कमी वेळात जगभरातील सर्व माहिती घर बसल्या पाहायला मिळते. मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे कार्यही प्रभवीपणे करते. |