खेळ आणि इतिहास स्वाध्याय
खेळ आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी
१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1. ऑलिंपिक स्पर्धाची परंपरा ............ येथे सुरू झाली.
उत्तर : ऑलिंपिक स्पर्धाची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली.
2. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ............. म्हणत.
उत्तर : महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.
ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
1. मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
2. वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
3. स्केटींग - साहसी खेळ
4. बुद्धिबळ - मैदानी खेळ
उत्तर :
चुकीची जोडी : बुद्धिबळ - मैदानी खेळ
दुरुस्त जोडी : बुद्धिबळ - बैठे खेळ
२. टिपा लिहा.
1. खेळणी आणि उत्सव.
उत्तर :
i) विविध संस्कृतींत आणि धर्मात उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. संताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो.
iii) गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
iv) बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात.
2. खेळ व चित्रपट.
उत्तर :
iii) मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
उत्तर :
i) विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.
ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.
iii) हौशी खेळाडू शिकण्यासाठी प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.
iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
2. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
उत्तर :
मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.
i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.
ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.
iii) उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1. भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
उत्तर :
खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते.
i) खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत.
ii) व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.
iii) खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात.
iv) 'षट्कार' नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे.
v) द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात.
vi) इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.
2. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर :
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत..
i) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.
ii) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते.
iii) ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.
iv) विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.
v) खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूच माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.
vi) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.
3. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
मैदानी खेळ | बैठे खेळ |
1. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. 2. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. 3. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. 4. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. 5. मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही आधिक मिळतो. 6. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. 7. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो. | 3. या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. 4. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही. 5. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. 6. बैठ्या खेळांना शारीरिक गरज कौशल्याची नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते. 7. बैठ्या खेळांत बुद्धीबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो. |