भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी






१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. चित्रकला आणि शिल्पकला यांचा ................ मध्ये समावेश होतो. 

उत्तर : चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो. 

2. मथुरा शिल्पशैली ............. काळात उदयाला आली. 

उत्तर : मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली. 


ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

1. कुतुबमिनार  -  मेहरौली 

2. गोलघुमट  -  विजापूर 

3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस  -  दिल्ली

4. ताजमहल  -  आग्रा

उत्तर :

चुकीची जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस  -  दिल्ली

दुरुस्त जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस  -  मुंबई


२. टिपा लिहा. 

1. कला 

उत्तर :

i) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात.   

ii) 'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते.   

iii) ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृतहोते.  

iv) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.


2. हेमाडपती शैली

उत्तर :

i) महाराष्ट्रातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती मंदिरे' असे म्हणतात. 

ii) हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छाया प्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. 

iii) हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतोदगडांमध्ये एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. या प्रकारच्या शैलीला हेमाडपंती शैली असे म्हणतात. 


3. मराठा चित्रशैली 

उत्तर :

इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. 

i) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.

ii) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.

iii) वाड्यांचे दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. 

iv) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.


३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 

उत्तर :

i) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत हे माहीत व्हायला हवे. 

ii) त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. 

iii) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात.

iv) एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते, त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


2. चित्रकथीसारख्या नामशेष होण्याऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. 

उत्तर :

i) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारतातील सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय.

ii) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे.

iii) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे; कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे.


४. पुढील तक्ता पूर्ण करा. 


 मंदीर स्थापत्य शैली 

 नागर 

 द्राविड 

 हेमाडपंती 

  वैशिष्ट्ये 

 

 

 

 उदाहरणे 

 

 

 


उत्तर :


 मंदीर स्थापत्य शैली 

 नागर 

 द्राविड 

 हेमाडपंती 

  

वैशिष्ट्ये 

 

क्रमश: लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. 


द्राविड शैलीमध्ये मंदिराचा पाया (भाग) चौरसाकृती आहे आणि पवित्र स्थानापेक्षा शिखर हा अंशतः पिरामिड आहे. ज्यामध्ये आडव्या विभाजनासाठी अनेक मजले आहेत. समितच्या वरच्या बाजूला अमालक आणि कलंशच्या जागी येथे पट्ट्यांचा वापर केला जातो. मंदिराच्या या शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उच्च  आणि प्रशस्त अंगणात  वेढलेले आहेत.



या मंदिराच्या भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. 

 

उदाहरणे 

 

खजुराहो मंदिर, देवगढचे दशावतार मंदिर, भितरगाँवचे ईंट इत्यादी.

 

उदा. दक्षिण भारतात ही मंदिरे आढळतात. विशेषतः तामिळनाडू राज्य उदा. बालाजी मंदिर - तिरुपती, मीनाक्षी मंदिर - मदुराई.


 

मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ


५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. 

उत्तर :

अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले.

i) गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या मिर्तीवर कोरलेली आढळतात. 

ii) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले.

iii) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. 

iv) नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला.

v) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली.

vi) वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात.


2. भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 

उत्तर :

मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे -

 i) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा  अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस 'मुस्लीम स्थापत्यशैली' म्हणतात. 

ii) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट) 

iii) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. 

iv) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे.

v) फतेहपूर-सिक्री येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.

vi) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.


3. कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात -

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. 

iii) औदयोगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. 

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची मरज असते.

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.


4. पृष्ठ क्र. २३ वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. 

अ) निसर्गाचे चित्रण    ब) मानवाकृतींचे रेखाटन

क) व्यवसाय    ड) घरे

उत्तर :

अ) निसर्गाचे चित्रण : या चित्रामध्ये एक वर्तुळ, एक त्रिकोण आणि एक चौरस असतो. ही अत्यंत प्राथमिक भित्तिचित्रे अतिशय मूलभूत समजली जातात. चित्रकाराच्या निसर्ग निरीक्षणातून सूर्य आणि चंद्र, पर्वत आणि मर्मभेदक झाडे दिसतात. केवळ चौरसाच्या आकृतीत भिन्न तर्कशास्त्राचे पालन केलेले दिसते आणि हा मानवी शोध असल्याचे कळते. 

ब) मानवाकृतींचे रेखाटन : मानवीकृती त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केली जाते. वरचा त्रिकोण पोट आणि खालचा लहान त्रिकोण म्हणजे ओटीपोट असते. स्त्री व पुरुष, नाचणारी व खेळणारी मुले यांचे चित्र रेखाटले आहे. 

क) व्यवसाय : या चित्रकलेत वारली विशेष करून व्यवसाय दाखवितात. यांच्या चित्रात मध्यवर्ती भाग विशेषकरून शिकार, मासेमारी आणि शेती यांनी केंद्रित करतात. 

ड) घरे : वारली चित्रकलेत घरांची चित्रे रेखाटताना रेषांचा, त्रिकोण, चौकोन, आयातकृतींचा ववापर करतात. यावरून त्यांच्या घरांच्या रचनेची माहिती मिळते. 

या सर्व मुद्द्यांवरून वारली समाजाची जीवनशैलींची ओळख पटते.        

Previous Post Next Post