लोकसंख्या स्वाध्याय

लोकसंख्या स्वाध्याय

लोकसंख्या स्वाध्याय 

लोकसंख्या स्वाध्याय इयत्ता दहावी



प्रश्न १. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. 

अ ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. 

उत्तर : हे विधान बरोबर आहे. 


आ ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. 

उत्तर : हे विधान बरोबर आहे. 


इ ) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. 

उत्तर : हे विधान चूक आहे. 

भारताच्या लोकांचे आयुर्मानात वाढ होत आहे. 


ई ) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. 

उत्तर : हे विधान चूक आहे. 

भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे. 


उ ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. 

उत्तर : हे विधान चूक आहे. 

ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे. 


प्रश्न २. दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. 

हिमालय प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश

उत्तर : 1. उत्तर प्रदेश  2. आंध्र प्रदेश  3. मध्य प्रदेश  4. हिमाचल प्रदेश  5. अरुणाचल प्रदेश


आ ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा. 

ॲमेझाॅनस, रिओ दी जनेरिओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना

उत्तर : 1. ॲमेझाॅनस  2. पॅराना  3. अलाग्वास  4. सावो पावलो  5. रिओ दी जनेरिओ


इ ) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. 

सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंदयांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीय उपयुक्त जमीन. 

उत्तर :


 


प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. 

उत्तर :  

अ ) साम्य 

 भारत 

ब्राझील  

 

i) भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. 

ii) सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. 

iii) प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो.  

 

i) ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. 

ii) सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची काही भागात भरभराट झाल्याने या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. 

 iii) प्राकृतिक रचना, हवामान, सुखसुविधा या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. 

 

ब ) फरक 


 भारत 

ब्राझील  

 

i) भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १२१ कोटी होती. 

ii) लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 

iii) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे. 

iv) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चोेकिमी आहे.   

 

i) ब्राझीलची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार सुमारे १९ कोटी होती. 

ii)लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझील जगात पाचव्या क्रमांकाचा देश आहे. 

iii) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी २.७८% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. 

iv) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चोेकिमी आहे. 



आ ) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 

उत्तर : 

i) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.

ii) उदा., भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या अँमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.

iii) सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशांत लोकसंख्येचे दाट विरतण आढळते. 

iv) उदा., भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.


प्रश्न ४. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

उत्तर :

i) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. 

ii) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणपेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. 

iii) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीचे होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन आहे.   


आ ) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. 

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते. 

iii) ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.


इ ) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. 

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

iii) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.


ई ) ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. 

उत्तर :

i) ॲमेझाॅन खोऱ्यातील हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यांमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. 

ii) वाहतुकीच्या मार्गाच्या अभावामुळे उद्योगधंद्याच्या विकासावर मर्यादा आल्या. त्यामुळे ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.


उ ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. 

उत्तर :

i) गंगा नदीच्या गाळामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक बनला आहे. 

ii) शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे. 

iii) कुटीर उद्योग व लघु उद्योगसाठी हे खोरे अग्रेसर आहे. 

iv) सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता तसेच शेती व उद्योगधंदे यासर्व कारणांमुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. 


प्रश्न ५. अ ) एक चोेकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चोेकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा. 

आ ) आकृती 'आ' मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा. 



उत्तर : 

अ ) एक चोेकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चोेकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी. पुढीलप्रमाणे आहे. 

 

 आकृती 'अ' 

 आकृती 'आ' 

 १ चोेकिमी 

 ७ 

 १८ 

 स्त्रिया 

 ३ 

 १० 

 पुरुष 

 ४ 

 ८ 


'अ' या चोेकोनातील लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आहे आणि 'आ' या चोेकोनातील लोकसंख्येची घनता जास्त आहे. 

 आ ) आकृती 'आ' मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण दर्शविते. त्यानुसार स्त्री पुरुष प्रमाण 

                                                             स्त्रिया : पुरुष 

१) स्त्रियांचे प्रमाण  - १०००                       १००० : ८०० 

२) पुरूषांचे प्रमाण - ८००                              ५ : ४     


प्रश्न ६. आकृती 'आ' मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा. 

उत्तर :

i) प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींमुळे येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. 

ii) या लोकसंख्येच्या घनतेत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. 

iii) सपाट मैदानी प्रदेश, अनुकूल हवामान असणाऱ्या भागात लोकसंख्येची जास्त घनता आढळते, तर अति उंच पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश व दुर्गम भागात लोकसंख्येची कमी घनता आढळते. 

Previous Post Next Post