पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय
पर्यटन वाहतूक व संदेशवहन इयत्ता दहावी स्वाध्याय
प्रश्न १. चूक की बरोबर ते सकारण सांगा.
अ ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. त्यामुळे देश-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.
iii) पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जात आहे. म्हणून भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
आ ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.
ii) त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो.
iii) पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे, असे म्हणतात.
इ ) देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते.
ii) वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलनक्षमता वाढते, तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो.
iii) आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते. यावरून हे सिद्ध होते की, देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
ई ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता अनेक परदेशी पर्यटक पर्यटनासाठी येतात.
ii) तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तेथे सांस्कृतिक वारसा ही लाभलेला आहे. त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. परंतु ही वाढ २०१० पासून अधिक झालेली आढळते. त्यामुळे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात ?
उत्तर :
i) ब्राझीलमधील पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझाॅन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी, तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षिक होतात.
ii) 'ब्राझीलिया' हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे.
iii) रिओ दी जनेरिओ आणि सावो पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. हे सर्व घटक पर्यटकांना आधिक आकर्षित करतात.
आ ) ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत
उत्तर :
ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात अनेक अडचणी आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
i) ॲमेझॉनच्या खोऱ्यामुळे ब्राझीलचा अंतर्गत क भाग घनदाट जंगलाचा बनला आहे. तेथील झाडे खूप उंच वाढलेली आहेत. वृक्षांच्या फांदयांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्यात तळाशी अंधार असतो.
ii) वृक्षांचे टणक लाकूड, दलदल, रोगट हवामान, असंख्य कीटक, मजुरांची कमतरता, मानवी वस्तीचा अभाव यासारख्या अडचणींमुळे तेथे लोहमार्गांचा विकास होऊ शकत नाही.
iii) तसेच तेथील पँटानल हा पाणथळ भूमींचा प्रदेश असून ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैर्ऋत्य भागात पसरला आहे. हा प्रदेश ची दलदलीचा असल्यामुळे तेथेही लोहमार्गांचा विकास झाला नाही.
इ ) कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे
उत्तर :
दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे.
प्रश्न ३. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
ब्राझीलमधून ज्यावेळी विमान निघाले, त्यावेळी ३१ डिसेंबरच्या सकाळचे ११ वाजले असतांना नवी दिल्लीची स्थानिक वेळ ही संध्याकाळचे ७.३० वाजले असेल व १ जानेवारीचा सोमवार हा दिवस असेल. व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ ही पहाटेचे १.०० वाजले असेल व २ जानेवारीचा मंगळवार दिवस असेल.
प्रश्न ४. योग्य जोड्या जुळवा.
|
|
२) रस्ते वाहतूक ३) रिओ दी जनेरिओ ४) मनमाड |
ब ) भारतातील रेल्वेस्थानक क ) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग ड ) प्रमुख रस्ते मार्ग इ ) ४०° पश्चिम रेखावृत्त |
उत्तर :
२) रस्ते वाहतूक ३) रिओ दी जनेरिओ ४) मनमाड | क ) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग अ ) पर्यटन स्थळ ब ) भारतातील रेल्वेस्थानक |
प्रश्न ५ भोेगोलिक कारणे लिहा.
अ ) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
उत्तर :
i) ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे.
ii) पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
आ ) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
उत्तर :
i) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
ii) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
iii) ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही.
इ ) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
उत्तर :
i) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
ii) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उदयोग भरभराटीस आले आहेत.
iii) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून आहेत. दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
ई ) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
उत्तर :
i) वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गांचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
ii) वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
iii) वाहतूक मार्गांच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. मणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
उ ) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते
उत्तर :
i) प्राचीन काळी व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी जलमार्गाची फार मोठी मदत झालेली आहे. मात्र आज जलवाहतुकीचे स्वरूप बदलले असून जगातील ९५% आंतरराष्ट्रीय व्यापार हा जलमार्गाने चालतो.
ii) प्रचंड अवजड मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाचाच वापर प्रामुख्याने केला जातो. या मार्गाची वाहतूकक्षमता इतर कोणत्याही मार्गापेक्षा फार मोठी आहे.
iii) आज प्रचंड व विशिष्ट आकाराची जहाजे निर्माण झाल्याने खनिजे, अन्नधान्य, खनिजतेल यांची वाहतूक कमी खर्चात व लांब अंतरापर्यंत करता येते.
iv) पृथ्वीचा ७१% भाग पाण्याचे व्यापलेला असून त्यात महासागरांचा वाटा फार मोठा आहे. जगातील सर्व महासागर एकमेकांना जोडलेले असल्याने त्यातून लांब पल्ल्याची, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलवाहतूक करता येते. याचा अर्थ सागरमार्गीय खुल्या वाहतुकीसाठी पृथ्वीवर विस्तृत क्षेत्र उपलब्ध आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.
अ ) ॲमेझॉन आणि गंगा नदीतील जलवाहतूक
उत्तर :
ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक | गंगा नदीतील जलवाहतूक |
1. ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते. 2. ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. | 2. गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. |
आ ) ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन
उत्तर :
ब्राझीलमधील संदेशवहन | भारतातील संदेशवहन |
1. ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. 2. ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. | 1. भारतामधील संदेशवहन तुलनेने को विकसित व कमी कार्यक्षम आहे. 2. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांचे एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुरे ३०% लोकसंख्या संदेशवहनाची इंटरनेटचा वापर करते. |
इ ) भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ
उत्तर :
भारतीय प्रमाणवेळ | ब्राझीलची प्रमाणवेळ |
1. भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. 2. भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे पुढे आहे. 3. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. 4. भारतातील अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. | 2. ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. 3. ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. 4. ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील आणि पूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे. |
प्रश्न ७. टिपा लिहा.
अ ) आधुनिक संदेशवहन
उत्तर :
i) आधुनिक काळात संदेशवहन किंवा माहितीची देवाणघेवाण ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे.
ii) आजच्या आधुनिक युगात कृत्रिम उपग्रह हे संदेशवहनाचे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी साधन आहे.
iii) मोबाइलवर संदेशांचे आदानप्रदान होणे, दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम दिसणे, हवामानासंदर्भात अद्ययावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहांद्वारे, एकाच वेळेस करणे शक्य झाले आहे.
iv) सुदूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधनसंपत्तीचा अभ्यास व प्रादेशिक नियोजन करण्यासाठी होतो.
v) आंतरजाल व सामाजिक माध्यमांच्या युगात सर्वांना या व्यवस्थेचा वापर करावा लागतो.
vi) भारत सरकार ऑनलाइन ट्रेडिंग, पेमेंट, मनी ट्रान्स्फर इत्यादींचा पुरस्कार करत आहे. त्यासाठी मोबाईलवर वापरता येतील अशी अनेक ॲप्ससुद्धा विकसित करण्यात आली आहेत. या संदेशवहनांच्या सुविधांद्वारे आपण अनेक प्रकारची देयके भरणे, खरेदी-विक्री असे अनेक व्यवहार करू शकतो.
vii) संदेशवहनाची सुविधा आता मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. ही सुविधा फक्त दूरध्वनीवरून बोलणे किंवा संदेश पाठविण्यापुरती राहिली नसून आपण आता व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो.
आ ) टिपा लिहा भारतातील हवाई वाहतूक
उत्तर
i) भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाईमार्गाचा वापरही वाढत आहे.
ii) भारत हे एक विशाल राष्ट्र असल्यामुळे, राष्ट्रांतर्गत विविध स्थळांना जोडणाऱ्या वायुमार्गांची सेवा मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे.
iii) भारताच्या औद्योगिक व सांस्कृतिक प्रगतीमुळे जागतिक स्तरावर विशेष संबंध प्रस्थापित केले आहेत. जागतिकीकरणामुळे जगातील निरनिराळ्या राष्ट्रांशी संपर्क साधता यावा म्हणून वायुमार्गांची सेवा विकसित केली आहे.
iv) भारतीय वायुमार्गांचे व्यवस्थापन व नियमन शासकीय स्वायत्त संस्था करतात. देशांतर्गत वायुमार्गांचे व्यवस्थापन 'इंडियन एअरलाईन्स' ही संस्था करते. या संस्थेस 'इंडियन' असेही संबोधतात. इंडियन एअरलाईन्सची सेवा देशांतर्गत उतारू, माल व टपाल वाहून नेण्यासाठी फार उपयोगी आहे. तसेच इंडियन एअरलाईन्सद्वारे या प्रकारची सेवा भारताच्या शेजारी राष्ट्रांना देखील पुरवली जाते.
v) 'एअर इंडिया' ही संस्था आंतरराष्ट्रीय वासी व. माल वाहतूक करते.
vi) नव्या राष्ट्रीय धोरणांमुळे वायुमार्ग सेवेचा सुमारे १०० देशांशी करार झालेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने यु.के., चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, आखाती देश, यु.एस.ए. यांच्याशी वायुमार्गानी संपर्क वाढला आहे.
vii) केंद्र शासनाच्या नव्या बदललेल्या धोरणानुसार खाजगी संस्थांकडूनसुद्धा वायुमार्ग सेवा पुरवली जाते.
viii) 'पवनहंस' या शासकीय संस्थेमार्फत भारतात हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध केली गेली आहे.
ix) भारतातील नगरांमध्ये, महानगरांमध्ये तसेच राजधान्यांच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
इ ) टिपा लिहा प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
उत्तर :
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. नदया, अंतर्गत सरोवरे, कालवे, जलाशय यामधून चालणाऱ्या वाहतुकीला अंतर्गत जलवाहतूक म्हणतात.
i) पाण्याची नैसर्गिक पातळी जहाजांसाठी खोल नसल्यास वाहतूक थांबते. प्रवाहाची दिशा, पात्राची रुंदी हेही घटक महत्त्वाचे आहेत.
ii) नदीपात्रात साठलेला गाळ उपसून काढावा लागतो.
iii) अतिथंड प्रदेशात नट्यांची पात्रे गोठतात व वाहतूक ठप्प होते.
iv) विकसित प्रदेशाकडून निर्जन प्रदेशाकडे वाहणाऱ्या नदया निरुपयोगी ठरतात.
v) नदयांच्या मार्गामध्ये धबधबे, खडकांचे उंचवटे असल्यास वाहतूक करता नाही.
ई ) टिपा लिहा प्रमाणवेळेची उपयोगिता
उत्तर :
i) एखादया देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल, तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागांतील वेळेत फरक पडू शकतो. अशा वेळी त्या देशात प्रमाणवेळेचे महत्त्व अधिक असते.
ii) सर्वसाधारणपणे, देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागांतील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात.
iii) प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकांत सुसूत्रता आणता येते.
iv) प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागांतील बँका, शाळा व महाविदयालये, विविध बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी ठिकाणच्या कामकाजात सुसूत्रता आणता येते.