सागरी प्रवाह स्वाध्याय
सागरी प्रवाह स्वाध्याय इयत्ता आठवी
प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडा.
1) लॅब्रोडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे ?
i) पॅसिफिक
ii) दक्षिण अटलांटिक
iii) उत्तर अटलांटिक
iv) हिंदी
उत्तर :
लॅब्रोडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे.
2) खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे ?
i) पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह
ii) पेरू प्रवाह
iii) दक्षिण धृवीय प्रवाह
iv) सोमाली प्रवाह
उत्तर :
सोमाली प्रवाह हिंदी महासागरात आहे.
3) सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही ?
i) पर्जन्य
ii) तापमान
iii) भूमीय वारे
iv) क्षारता
उत्तर :
सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात भूमीय वाऱ्यांचा परिणाम होत नाही.
4) उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत खालीलपैकी कशाची निर्मिती होते ?
i) दव
ii) दहिवर
iii) हिम
iv) दाट धुके
उत्तर :
उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत दाट धुक्यांची निर्मिती होते.
5) उत्तर ध्रुवीय प्रदेशातून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते ?
i) उष्ण सागरी प्रवाह
ii) थंड सागरी प्रवाह
iii) पृष्ठीय सागरी प्रवाह
iv) खोल सागरी प्रवाह
उत्तर :
उत्तर ध्रुवीय प्रदेशातून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह थंड सागरी प्रवाह आहेत.
प्रश्न. 2. खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा.
1) सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
2) खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
3) पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वासाधारपणे विषृववृत्तीय प्रदेशात होते.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
4) मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
5) हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते.
6) ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. याउलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
प्रश्न. 3. पुढील गोष्टींचा परिणाम सांगा.
1) उष्ण प्रवाहांचा हवामानावर
उत्तर :
i) उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. तर काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते.
ii) तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत.
2) शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर
उत्तर :
शीत सागरी प्रवाहांमुळे धुव्रीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात.
3) सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर
उत्तर :
सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात.
4) उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश.
उत्तर :
ज्या ठिकाणी उष्ण व शीत प्रवाह एकत्र येतात. त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फा उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना येऊन मिळतात. त्यामुळे तिथे दाट धुके निर्माण होते..
5) सागरी प्रवाहांची वहनशक्ती
उत्तर :
i) सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणत: ते समुद्रबूड जमिनीच्या अधः सीमेजवळून वाहतात.
ii) सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते.
iii) पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात.
6) खोल सागरी प्रवाह
उत्तर :
खोल सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते.
प्रश्न. 4. सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे दया.
1)) हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल ?
उत्तर :
हंबोल्ट हा शीत सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथील पर्जन्याचे प्रमाण कमी होते. तसेच त्यामुळे तेथे ओसाड वाळवंटी प्रदेश तयार झाले आहे.
2) प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरांत दिसत नाहीत व का ?
उत्तर :
प्रति विषुववृत्तीय प्रवाह हे हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर या महासागरांत दिसत नाहीत. कारण हे महासागर या प्रवाहापासून दूर आहेत. तसेच विषववृत्तीय प्रवाह हे अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय पट्ट्यातच वाहतात.
3) उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का?
उत्तर :
उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाहीत. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. त्यामुळे शीत प्रवाह तिथे पोहचू शकत नाही.
4) उष्ण व शीत प्रवाह येणारी क्षेत्रे कोठे आहेत ?
उत्तर :
अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक, न्यू फाउंडलँड बेट इत्यादी. ही उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहेत.
प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती ?
उत्तर :
खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
i) खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात.
ii) वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे.
iii) गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते, असे पाणी पृष्ठभागावर येते, तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते.
2) सागरजल गतिशील कशामुळे होते ?
उत्तर :
i) समुद्रसपाटीपासून ५०० मी खोलीपर्यंतचा भाग वरचा थर असतो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता सहज पोहचतो.
ii) या विभागातील सागरी जलाची हालचाल ही तापमान व क्षारता यामुळे होते. तर ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरजलाला गती प्राप्त होते.
3) सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते ?
उत्तर :
i) सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात.
ii) नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागरजलपृष्ठाशी घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात.
iii) महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहतात, किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते.
iv) एखाद्या प्रदेशात वर्षभर एकाच दिशेने वाहणारे वारे असतील तर त्याचा परिणाम सागरजलाच्या हालचालीवर होतो. उत्तर गोलार्धात ०° ते ३०° उत्तर अक्षवृत्तीय दरम्यान पूर्वीय वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. तर दक्षिण गोलार्धात ०° ते १३° दक्षिण अक्षवृत्तांच्य दरम्यान ते आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात सागरजलाची हालचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे होते.
v) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांचे चक्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सुरू होते. अशाप्रकारे सागरी प्रवाहांना दिशा मिळते.
4) कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात ?
उत्तर :
i) कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीत प्रवाह वाहतो त्यामुळे तेथील हवामान अतिशय थंड असते.
ii) शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशाकडून या भागात हिमनग वाहत येतात.
iii) तसेच हिवाळ्यात जानेवारी महिन्यात - २८° से इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात १६° से इतके तापमान असते म्हणून कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात.