1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
अ. क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनिअम
उत्तर :
अमोनियम
कारण - इतर सर्व अँनायन आहेत.
आ. हायड्रोजन क्लोराइड, सोडिअम हायड्रॉक्साइड, कॅल्शिअम ऑक्साइड, अमोनिया
उत्तर :
हायड्रोजन क्लोराइड
कारण - इतर सर्व आम्लारिधर्मी संयुगे आहेत.
इ. अँसेटिक अँसिड, कारबॉनिक अँसिड, हायड्रोक्लोरिक अँसिड, नायट्रिक अँसिड
उत्तर :
अँसेटिक अँसिड
कारण - इतर सर्व अकार्बनी अँसिड्स आहेत.
ई. अमोनियम क्लोराइड, सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम नायट्रेट, सोडिअम सल्फेट.
उत्तर :
अमोनियम क्लोराइड
कारण - इतर सर्व उदासीन क्षार आहेत.
उ. सोडिअम नायट्रेट, सोडिअम कार्बोनेट, सोडिअम सल्फेट, सोडिअम क्लोराइड
उत्तर :
सोडिअम कार्बोनेट
कारण - इतर सर्व उदासीन क्षार आहेत.
ऊ. कॅल्शिअम ऑक्साइड, मॅग्नेशिअम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड, सोडिअम ऑक्साइड
उत्तर :
झिंक ऑक्साइड
कारण - इतर सर्व आम्लधारी ऑक्साइडे आहेत
ए. स्फटिकरूप मोरचूद, स्फटिकरूप मीठ, स्फटिकरूप फेरस सल्फेट, स्फटिकरूप सोडिअम कार्बोनेट
उत्तर :
स्फटिकरूप मीठ
कारण - इतर सर्व स्फटिकजल आहेत
ऐ. सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, अँसेटिक अँसिड, सोडिअम अँसिटेट
उत्तर :
अँसेटिक अँसिड
कारण - इतर सर्व विद्युत अपघटनी पदार्थ आहेत.
2. पुढील कृती केल्यावर काय बदल डिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
अ. कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले.
उत्तर :
i) कुठल्याही द्रावणात पाणी मिळवल्यास द्रावणाची संहती कमी होते.
ii) जर कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात तितकेच म्हणजे 50 मिली पाणी मिळवल्यास कॉपर सल्फेटची संहती कमी होऊन ते विरल होईल.
iii) द्रावणाचा रंग हलका होईल. निळा रंग हलका निळा होईल.
आ. सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनाॅल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
उत्तर :
i) फिनाॅल्फ्थॅलीन दर्शक कुठल्याही द्रावणात टाकल्यास तेथे रासायनिक अभिक्रिया होऊन द्रावणाचा रंग बदलतो.
ii) त्याकारणानेच जर सोडिअम डायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनाॅल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकल्यास द्रावणाचा रंग गुलाबी होईल.
इ. 10 मिली विरल नायट्रिक अँसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले.
उत्तर :
i) तांब्याचा काही किस विरल नायट्रिक अँसिडमध्ये टाकल्यास तांब्याची नायट्रिक अँसिडमधल्या NO3- मूलकाशी रासायनिक अभिक्रिया होते.
ii) या अभिक्रियेच्या परिणामी कॉपर नायट्रेडचे द्रावण तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
ई) 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
उत्तर :
i) लिटमस कागद संश्लिष्ट दर्शक आहे.
ii) 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकल्यास HCl आम्लधर्मी असल्याने निळा लिटमस लाल होतो.
iii) त्यानंतर जर त्यात 2 मिली संहत NaOH मिळवल्यास NaOH च्या आम्लारी गुणधर्मामुळे लाल लिटमस निळा होईल.
उ. विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.
उत्तर :
i) HCl हे आम्लधर्मी आहे. तसेच NaOH आणि मॅग्नेशिअम ऑक्साइड आम्लारिधर्मी आहे.
ii) विरल HCl आम्लधर्मी असल्याने आम्लारिधर्मी मॅग्नेशिअम ऑक्साइडशी त्याचे उदासीकरण होऊन मॅग्नेशिअम क्लोराइड हे मीठ व पाणी तयार होते.
iii) आम्लारी गुणधर्मामुळे मॅग्नेशिअम ऑक्साइडची विरल NaOH या आम्लारिधर्मी संयुगाशी कुठलीही रासायनिक अभिक्रिया होत नाही.