भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
उत्तर :
कारण - i) भूकवचाची खंडाखालील जाडी १६ ते ४५ किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणींखाली ४० किमीपेक्षा जास्त असते, तर सागरपृष्ठाखाली ती १० किमीपेक्षा कमी आढळते.
ii) भूपृष्ठ व सागरपृष्ठ हे भूकवचाचेच दोन उपविभाग आहेत. भूपृष्ठीय कवचाची सरासरी जाडी सुमारे ३० किमी आहे. तर सागरीय पृष्ठाची या थराची सरासरी जाडी ७ ते १० किमी आहे. यावरून हे स्पष्ट होते की भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.