सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय

सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय

सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय

सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)

1) रामकृष्ण मिशनची स्थापना ................. यांनी केली. 

उत्तर :

रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. 


2) मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ................. यांनी केली. 

उत्तर :

मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. 


3) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना .................... यांनी केली. 

उत्तर :

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.


2. पुढील तक्ता पूर्ण करा. 

 समाजसुधारकाचे नाव

संस्था 

वृत्तपत्र/पुस्तक 

संस्थेची कार्ये 

 राजा राममोहन रॉय

 ...............

 संवादकौमुदी

 ..................

 ................. 

 आर्य समाज 

................. 

 .................

 महात्मा फुले

................ 

 गुलामगिरी

 ..................


समाजसुधारकाचे नाव

 संस्था

 वृत्तपत्र/पुस्तक 

 संस्थेची कार्ये 

 राजा राममोहन रॉय

 ब्राह्मो समाज

 संवादकौमुदी

एकेश्वरवाद, उच्च-नीचअसा भेदभाव ण पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. विधवा विवाह व स्त्रियांच्या शिक्षणाचे समर्थन केले.  

 स्वामी दयानंद सरस्वती

 आर्य समाज 

सत्यार्थ प्रकाश  

प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. स्त्री-पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले.  

 महात्मा फुले

सत्यशोधक समाज

 गुलामगिरी

त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध, बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. 


3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू राहिल्या.

उत्तर : 

इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतात नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीच असा भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती म्हणून भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरूच राहिल्या.


2) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.

उत्तर :

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करू लागले. त्याकाळात ब्राह्मण समाजात विधवा झालेल्या स्त्रीचे केस कापून तिला विद्रुप करण्याची प्रथा होती. महात्मा फुलेंनी या प्रथेला विरोध केला. ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.


4. टीपा लिहा.

1) रामकृष्ण मिशन

उत्तर : 

रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ.स. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेचे कार्य केले. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्रीशिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत मिशनने कार्य केले व आजही करत आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतातील तरुणांना 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,' असा संदेश त्यांनी दिला.


2) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा

उत्तर : 

१८४८ मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला.

Previous Post Next Post