वृष्टी स्वाध्याय
वृष्टी स्वाध्याय इयत्ता नववी
वृष्टी स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल
प्रश्न. 1. पुढील वर्णनावरून वृष्टीची रुपे ओळखा.
1) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्त्रोत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.
उत्तर :
पाऊस (पर्जन्य)
2) पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.
उत्तर :
धुके
3) विषुवृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.
उत्तर :
गारपीट
4) भूपृष्ठावार शुभ्र कापसासारखे थर सचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.
उत्तर :
हिमवृष्टी
प्रश्न. 2. पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.
उत्तर :
आकृती (अ) |
i) आकृती (अ) हा आरोह प्रकारचा पाऊस आहे. आरोह या प्रकारचा पाऊस आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व द. अमेरिकेतील अँमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्तीय प्रदेशात पडतो.
आकृती (ब) |
ii) आकृती (ब) हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस मोसमी हवामानाच्या प्रदेशातील भारतात पडतो.
आकृती (क) |
iii) आकृती (क) हा आवर्त प्रकारचा पाऊस आहे. या प्रकारचा पाऊस समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात पडतो.
प्रश्न. 3. वरील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(टीप - विद्यार्यांनी प्रश्न 2 मधील आकृती अ, ब, क, या आकृत्या उत्तरासाठी पहाव्या.)
1) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे.
उत्तर :
डोंगराच्या वाताभिमुख उतारावर जास्त पाऊस पडत आहे.
2) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नावे द्या.
उत्तर :
हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस मोसमी हवामानाच्या प्रदेशातील भारतात पडतो.
3) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता ?
उत्तर :
i) आकृती (अ) म्हणजे आरोह पाऊस. यात हवा तापल्याने प्रसारण पावून हलकी होते व ती वार जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारणक्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पचे साद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो.
ii) आकृती (क) म्हणजे आवर्त पाऊस. यात एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते. व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो.
अशाप्रकारे आकृती (अ) व (क) या आकृतींमध्ये हा फरक दिसून येतो.
4) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे ?
उत्तर :
वादळी वारे व पूर ही परिस्थिती प्रतिरोध व आवर्त या पावसाशी संबंधित आहे.
5) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा ?
उत्तर :
सिंगापूरला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असावा.
प्रश्न. 4. वेगळा घटक ओळखा.
1) प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस.
उत्तर :
आम्ल पाऊस
2) हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू
उत्तर :
दवबिंदू
3) तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र
उत्तर :
वातदिशादर्शक
प्रश्न. 5. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते ?
उत्तर :
पृथ्वीवर हिम स्वरूपात, गारांच्या स्वरूपात व पावसाच्या (पर्जन्याच्या) स्वरूपात वृष्टी होते.
2) पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते ?
उत्तर :
पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजे पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारणक्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. म्हणजेच पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते.
3) कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो ? का ?
उत्तर :
प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो.
कारण - i) पृथ्वीच्या सर्वाधिक भाग हा समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. तसेच पर्वतशृंखला देखील बऱ्याच आहेत.
ii) प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे पर्वतरंगांच्या अडथळ्यांमुळे पडतो.
iii) हे वारे उंच पर्वतरांगांमुळे अडवले जातात व पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्वदिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो.
iv) तर आरोह प्रकारचा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात पडतो. तसेच आवर्त प्रकारचा पाऊस समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात व उष्णकटिबंधात मर्यादित क्षेत्रात पडतो. उर्वरित सर्वच क्षेत्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
4) भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात ?
उत्तर :
भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशांत हिम पडणे, पाऊस पडणे, काही प्रदेशांत दाट धुके पडणे, अचानक गारा पडणे इत्यादी जलाविष्कार दिसून येतात.
5) पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी ?
उत्तर :
पर्जन्यमापन करताना घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे आहे.
i) पर्जन्याची अचूक मोजणी व्हावी म्हणून पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावा लागतो. तो ६० सेमी. लांब, ६० सेमी. रुंद व ३० सेमी. उंच चबुतऱ्यावर घट्ट बसवावा लागतो. त्यामुळे तो वाऱ्याने पडत नाही. चबुतऱ्याभोवती वाळू पसरवलेली असते किंवा बारीक गवताचे आच्छादन तयार केलेले असते. त्यामुळे जोराचा पाऊस आला तरी जमिनीवर पडलेल्या पावसाच्या थेंबामुळे मातीचे कण उडून पर्जन्य मापकांत जात नाहीत.
ii) पावसाचे सर्व थेंब नरसाळ्यांत पडावेत त्यांना अडथळा होऊ नये. म्हणून पर्जन्यमापक हे झाड, इमारत व इतर उंच ठिकाणापासून दूर ठेवावा लागतो. ज्या चबुतऱ्यावर पर्जन्यमापक ठेवतात त्याच्या भोवती तारेचे कुंपन असते.
प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा.
1) दव आणि दहिवर
उत्तर :
दव | दहिवर |
i) हवेतील बाष्पाचा भूपृष्ठावरील लोखंडी पृष्ठभाग, गवत इत्यादी थंड वस्तुंशी संपर्क आल्यावर त्या बाष्पाचे सांद्रीभवन होते व त्याचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होते. हे जलकण थंड पदार्थाच्या पृष्ठभागावर चिकटून बसतात. अशा जलकणांना दव असे म्हणतात. ii) दव बनण्यास ०° से. पेक्षा अधिक तापमान असावे लागते.
|
2) हिम आणि गारा
उत्तर :
हिम | गारा |
i) वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होते. ii) अनेक सूक्ष्म हिमकण एकत्रित आल्याने त्यांचे आकारमान वाढते ते हवेत तरंगू शकत नाही. ते भूपृष्ठावार पडतात. त्यांनाच हिमवृष्टी असे म्हणतात. iii) हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. | ii) गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांवर हिमांचे नवीन थर साचतात. असे अनेकवेळा घडते. त्यामुळे गारा आकराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला गारपीट असे म्हणतात. iii) गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते. |