पर्यटन स्वाध्याय
पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी
पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान
प्रश्न. 1. पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
1) मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.
उत्तर :
परदेशी पर्यटन
2) गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटन गोव्यात आले होते.
उत्तर :
परदेशी पर्यटन
3) नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
उत्तर :
स्वदेशी पर्यटन
4) पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.
उत्तर :
स्वदेशी पर्यटन
5) पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी गावाल जाऊन आली.
उत्तर :
स्वदेशी पर्यटन
6) सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
उत्तर :
स्वदेशी पर्यटन
प्रश्न. 2. 'अ' गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
उत्तर :
i) धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देवीदेवतांची मंदिरे असतात. अशा ठिकाणांना भेट देणे म्हणजे धार्मिक पर्यटन होय. उदा. शिर्डी, शेगाव, तिरूपती, पंढरपूर, कोल्हापूर, अमरनाथ इ.
ii) सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी आपल्या संस्कृतिचा ठेवा जतन केलेला असतो. अशा ठिकाणांना सांस्कृतिक पर्यटन असे म्हणतात. उदा. वाघा बार्डर, वेरुळची लेणी, ताजमहल, अशोक स्तंभ इत्यादी.
2) पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?
उत्तर :
पर्यटनाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.
i) पर्यटनाचे मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे. मानवाच्या तनमनाला विश्रांती मिळावी म्हणून पर्यटने आयोजित केली जातात.
ii) पर्यटनातून ज्ञानप्राप्ती होते. हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनाद्वारे जैवविविधतेची ओळख होते. जगभरातील महान संस्कृतीची हौशी पर्यटकांना ओळख झाली तर त्यांची ज्ञानवृद्धी होईल.
iii) पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. व्यवसाय हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.
3) पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.
उत्तर :
पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
i) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते.
ii) पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते.
iii) पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो.
iv) निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची, रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी, यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.
4) पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात.
उत्तर :
i) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.
ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. त्याबरो पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो.
iii) पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या संधी निर्माण होतात.
5) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
उत्तर :
पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या - i) बरीच अशी पर्यटन ठिकाणे भारतात आहेत. परंतु त्या ठिकाणाची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने र्यटकांना त्रास सहन करावा लागतो.
ii) पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्या, पण्याच्या व्यवस्था नसतात.
iii) पर्यटन ठिकाणांचे मार्ग नीट समजत नाही. याठिकाणी कुठेही चिन्हांचे संकेत नसल्याने पर्यटकांचा स्थळ शोधण्यात वेळ जातो.
iv) पुरेशा सोयी सुविधांअभावी अनेक पर्यटन स्थळांमध्ये सुलभता नाही.
पर्यटनांतील समस्यांवरील उपाय - i) प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचे समान प्रमाणात वाटप केले पाहिजे. ज्यामुळे तेथील पर्यटक तिथे पोहोचण्यास मदत होईल.
ii) जुन्या व पुरातन सांस्कृतिक वारसा संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे. आणि मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मूळ शैलीत नूतनीकरण करावे.
iii) सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यक सुविधा तसेच सुरक्षा पुरविण्यात यायला हवी.
iv) पर्यटन स्थळी प्रदूषित झालेल्या भागात स्वच्छता कार्यक्रम सुरू करावा.
v) स्थानिक सामग्रीचा वापर करून पर्यटकांना आवश्यक असलेले सामान उत्पादन करावे.
vi) बँकिंग सुविधा, विपणन आणि इतर पर्यटक केंद्र वाढविले पाहिजे.
6) आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा.
उत्तर :
नागपूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु ती दुर्लक्षित असल्यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा विकास झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन स्थळात भर पडेल. उदा. नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आंभोरा तिर्थक्षेत्र, छोटा ताजबाग, गणेश टेकडी मंदिर इत्यादी.
7) पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
उत्तर :
i) पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे.
ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.
iii) पर्यटन स्थळाची संपूर्ण माहिती असणारे व्यक्ती पर्यटकांना तेथील सविस्तर माहिती सांगतात. त्या मोबदल्यात ते तेथील लोकांना पैसे देतात. हा एकप्रकारचा त्यांचा रोजगार आहे.
iv) तसेच स्थानिक लोक आपल्या घरी पर्यटकांना पेइंगेस्ट म्हणून काही दिवसांसाठी ठेवतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. त्याचा मोबदला त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळतो. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
प्रश्न. 4. पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.
उत्तर :
पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचनाफलक - i) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा.
ii) पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्षांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या.
iii) धूम्रपान, मद्यपान करू नये.
iv) ध्वनी प्रदूषण करू नये.
v) झाडांना, फुलांना हात लावू नये.
प्रश्न. 5. पर्यटनासंबंधी 'अतिथी देवो भव' ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
i) 'अतिथी देवो भव' याचा अर्थ आपल्या घरी आलेले अतिथी हे देवासमान समजण्याची आपली भारतीय संस्कृती आहे.
ii) भारतात अनेक धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. जी अतिशय विलोभनीय आहेत. त्याचा आस्वाद घेण्यासाठी, ती स्थळे बघण्यासाठी देशा परदेशातले पर्यटक भारतात येतात.
iii) या देशा परदेशातील पर्यटन हे आपल्या भारतीयांसाठी अतिथी आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे.
iv) आपल्या संस्कृतीनुसार आपण बाहेरून येणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य अगदी मनापासून करतो. त्या मोबदल्यात आपल्याला समाधान मिळते.
v) भारतीय संस्कृतीतील विविधता, सन, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले अन्नपदार्थ अनेक पर्यटकांना आवडते. तसेच भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यांमुळे भारताची पर्यटनासंबंधी 'अतिथी देवो भव' ही भूमिका स्पष्ट होते.
प्रश्न. 6. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे कारणे सांगा.
उत्तर :
गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे -
i) ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी
ii) जळगाव जिल्ह्यातील उपनदेव
iii) रायगड जिल्ह्यातील साव
iv) अमरावती जिल्ह्यातील सलबर्डी
v) कापेश्वर, उनकेश्वर, उन्हवरे
कारण - पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेमुळे तसेच ज्या भागात चुनखडक, गंधक या खनिजाचे साठे असतात. त्या भागात गरम पाण्याचे झरे निर्माण झाले आहे.
2) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो ?
उत्तर :
वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध पश्चिम महाराष्ट्रांकडे आहे. कारण तेथे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे अधिक असल्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून वाहतुकीचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो.