विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय
विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी
विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान
प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ................... यांची नेमणूक झाली.
अ) डॉ. होमी भाभा
ब) डॉ. होमी सेठना
क) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
ड) डॉ. राजा रामण्णा
उत्तर :
अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.
2) इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ...................... हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
अ) आर्यभट्ट
ब) इन्सॅट १ बी
क) रोहिणी-७५
ड) ॲपल
उत्तर :
इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
1) पृथ्वी - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
2) अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र
3) आकाश - जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
4) नाग - शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र
उत्तर :
चुकीची जोडी : अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र
प्रश्न. 2. अ. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.
उत्तर :
ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) अवकाश संशोधन
उत्तर :
i) केरळ राज्यातील थंबा येथील 'थुबा इक्विटोरियल लाँच सेंटर' वरून 'इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च' या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले.
ii) १९६९ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी - ७५' अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
iii) या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले.
iv) भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.
2) टलेक्स सेवा
उत्तर :
i) देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली.
ii) १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला.
iii) या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.
प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली
उत्तर :
कारण i) अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती.
ii) भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. म्हणून पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
2) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला
उत्तर :
कारण i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ में १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली.
ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
3) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले
उत्तर :
कारण i) १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संररक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले.
ii) त्यानंतर ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 'भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही' अशी ग्वाही दिली म्हणून अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.
1) पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा
उत्तर :
i) शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
ii) प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 'अणुस्फोट' चाचणीचा निर्णय घेतला. त्यासाठी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली.
iii) अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आष्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणील महत्त्वाचा वाटा होता.
iv) पोखरण येथे १९७४ मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली. आणि ११ मे १९९८ रोजी दुसरी अणुस्फोट चाचणी केली.
2. भास्कर-१ हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे
उत्तर
भास्कर-१ हा उपग्रह पुढील क्षेत्रासाठी उपयोगी आहे.
i) देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे. हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते.
ii) या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती.
iii) या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनॉग्राफी) मध्ये झाला.
प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो
उत्तर :
आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल, टिव्ही, इंटरनेट, रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो.
2. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' असे का संबोधल जाते
उत्तर :
i) भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत १९५८ साली 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (DRDO) स्थापना झाली.
ii) संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतींत देशाला स्वावलंबी बनवणे हा य संस्थेचा उद्देश होता.
iii) १९८३ नंतर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली.
iv) क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. यांना डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच 'मिसाईल मॅन' असे संबोधले जाते.
3. संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते
उत्तर
संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाइट वर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते. प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणकीकृत अनआरक्षित तिकिट प्रणाली केंद्रावरून खरेदी करू शकतात. तसेच रेल्वेस्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकिट वेंडिग मशीनद्वारे तिकिट प्राप्त केले जाऊ शकते.
4. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा
उत्तर :
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
i) १९९८ मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली.
ii) सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत.
iii) या मार्गावर एकूण १२ बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील ६.५ किमी लांबीचा बोगदा सर्वांत मोठा बोगदा आहे.
iv) येथे ७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील रावती नदीवरील २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत मोठा आहे.
v) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा पूल सर्वांत उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.