आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल


प्रश्न. 1. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेषावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा. 

उत्तर :



प्रश्न. 2. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?

1) पूर्वकडून पश्चिमेकडे

2) पश्चिमेकडून पूर्वेकडे

3) दक्षिणेकडून उत्तरेकडे

4) उत्तरेकडून दक्षिणेकडे

उत्तर :

पश्चिमेकडून पूर्वेकडे


आ) जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील ?

1) बुधवार सकाळचे सहा

2) बुधवार रात्रीचे नऊ

3) गुरुवार दुपारचे दोन

4) गुरुवार संध्याकाळचे सहा

उत्तर :

बुधवार रात्रीचे नऊ


इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. 

1) ०°

2) ९०° पूर्व

3) ९०° पश्चिम

4) १८०°

उत्तर :

१८०°


ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ?

1) पूर्व

2) पश्चिम

3) उत्तर 

4) दक्षिण

उत्तर :

पश्चिम


उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे कशामुळे सुसूत्रता येते ?

1) जी. पी. एस. प्रणाली

2) संरक्षण खाते

3) वाहतुकीचे वेळापत्रक

4) गोलार्ध ठरवण्यासाठी

उत्तर :

वाहतुकीचे वेळापत्रक



प्रश्न. 3. भौगोलिक कारणे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. 

उत्तर :

कारण - i) आतंरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. 


ii) आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. 


iii) आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक वा घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. 


iv) जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. 


v) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.


आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. 

उत्तर :

कारण - i) आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती.

ii) पूर्व बाजूला एक वार व एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. 

iii) शिवाय जमिनीवरून चालतांना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.


प्रश्न. 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

उत्तर :

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना पुढील बाबी विचारात घेतल्या आहेत. (i) प्रवासाची दिशा (ii) चालू असलेला वार व दिनांक

i) प्रवासाची दिशा - आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते, की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, तर पूर्वेला संपतो. 

ii) चालू असलेला वार व दिनांक - पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर त्याला आहे तोच वार (मागचा) मानावा लागतो. 


आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.


इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय बाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. 

ii) त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८० रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.


ई) आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.


उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

उत्तर :

i) १८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत १२ तासांच्या फरकाने येते, त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. 

ii) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही १८०° रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली जाते.


प्रश्न. 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. 

अ) मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-लॉसएंजिलिस-टोकियो. 

आ) दिल्ली-कोलकाता-सिंगापूर-मेलबर्न. 

इ) कोलकाता-हाँगकाँग-टोकियो-सॅनफ्रॅन्सिस्को

ई) चेन्नई-सिंगापूर-टोकियो-सिडनी-सांतियागो

उ) दिल्ली-लंडन-न्यूयॉर्क

उत्तर :

 

Previous Post Next Post