परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय

परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय

परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय

परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय इयत्ता नववी

परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान


1. कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा. 

 जैव-भू-रासायनिक

 जैविक प्रक्रिया

 अजैविक प्रक्रिया

 1. कार्बन चक्र 

2. ऑक्सिजन चक्र 

3. नायट्रोजन चक्र

 

 


उत्तर :

 जैव-भू-रासायनिक

 जैविक प्रक्रिया

 अजैविक प्रक्रिया

 1. कार्बन चक्र 

2. ऑक्सिजन चक्र 

3. नायट्रोजन चक्र

श्वसन, प्रकाश संश्लेषण

श्वसन, उत्सर्जन, प्रकाश संश्लेषण

नायट्रोजनचे स्थिरीकरण, अमोनिकरण

कारखान्यातील CO2

ज्वलन, विघटन

नायट्रीकरण, वातावरणीय नायट्रोजन स्थिरीकरण


2. खालील चुकीची विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. व तुमच्या विधानाचे समर्थन करा. 

अ. अन्नसाखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी करा. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. 

पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर होय. परिसंस्थेत शाकाहारी प्राणी ही पहिली पोषणपातळी तर मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. 


आ. पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय वाहतूक गणला जातो. कारण जमीन, पाणी यातून शोषल्या गेलेली पोषणद्रव्ये काही काळापुरती सजीवांच्या शरीरात असली तरी मृत सजीवांच्या शरीरातून विघटक ती पुन्हा परिसंस्थेला परत करतात. 


इ. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

परिसंस्थेत वनस्पतींना उत्पादक तर शाकाहारी प्राण्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. वनस्पती ज्यांचे अन्न आहे ते सर्व प्राणी शाकाहारी प्राणी आहेत. 


3. कारणे लिहा. 

अ. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.   

उत्तर :

कारण - i) कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे सूर्य. 

ii) परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौरऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. 

iii) ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषणपातळीकडे संक्रमित केली जाते. 

iv) विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सुर्याकडे परत जात नाही म्हणून ऊर्जाचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. 


आ. विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे. 

उत्तर :

कारण - i) सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषणद्रव्यांचे अजैविक घटकांकडून व जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. 

ii) पोषद्रव्यांचे पृथ्वीवरील साठे मर्यादित असल्यामुळे जैव-भू-रसायन चक्र निरंतर चालू राहण्याकरिता जैव-भू-रसायन चक्राचे संतूलन असणे आवश्यक आहे. 


इ. पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो. 

उत्तर :

कारण - i) सर्व सजीवांचा वाढसाठी पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. 

ii) ही पोषणद्रव्ये व वनस्पती जमीन, पाणी यांतून शोषून घेतात. पुढे ही पोषणद्रव्ये एका पोषणपातळी कडून दुसऱ्या पोषणपातळीलाहस्तांतरीत केली जातात. 

iii) सजीवांच्या मृत शरीरातून विघटक परिसंस्थेला ही पोषणद्रव्ये परत करतात. हे चक्र अव्याहत सुरू असते. म्हणून पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो असे म्हटले जाते. 


4. आकृती स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा. 

अ. कार्बन चक्र 

उत्तर :


कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यत: प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैव-भू-रासायनिक चक्र आहे. 


आ. नायट्रोजन चक्र

उत्तर :

आपल्या वातावरणात नायट्रोजन (78%) हा वायू सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. निसर्गचक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण 'नायट्रोजन चक्र' म्हणून ओळखले जाते. 


इ. ऑक्सिजन चक्र 

उत्तर :


पृथ्वीवरील तिनही आवरणामध्ये (21%) ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते. तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो. 



5. विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल ?

उत्तर :

जैव-भू-रसायन चक्राचा समतोल राखण्यासाठी खालील प्रयत्न केले जावू शकतात.

i) वनस्पतींची लागवड व जोपासना करणे. 

ii) वनांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करणे. 

iii) प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक यांसारख्या सर्व सजीवांच्या प्रजाती टिकून राहतील यांसाठी प्रयत्न करणे. 

iv) जैविक कचरा नुसता जाळून न टाकता त्यापासून खत निर्मिती करणे. 

v) सजीवांना हानी पोहचवणाऱ्या प्रदूषकाच्या निर्मितीत घट करणे. 

vi) भू, जल, वायू प्रदूषण होऊ नये याची काळजी घेणे.


6. अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा. 

 उत्तर :

उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतक्रिया सुरू असतात, या आंतरक्रियेत एक क्रम असतो त्याला अन्नसाखळी म्हणतात. प्रत्येक साखळीत अशा चार वा पाचहून अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश असतो. त्यातूनच अन्नजाळे निर्माण होते.

एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. उदा. एखादा किटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो मात्र तोच किटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. हे जर एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीचे, अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. यालाच निसर्गातील अन्नजाळे म्हणतात.

यात कोणत्याही जैविक वा अजैविक घटकात वाढ किंवा घट यांमुळे अन्न साखळी तसेच अन्न जाळयांवर परिणाम होतो. 


7. जैव-धू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर :

सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला 'जैव-भू-रासायनिक  चक्र' असे म्हणतात. 

जैव-भू-रासायनिक चक्राचे प्रकार - (i) कार्बन चक्र (ii) नायट्रोजन चक्र (iii) ऑक्सीजन चक्र 

जैव-भू-रासायनिक चक्राचे महत्त्व - सजीवांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. शीलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमांतून हे चक्र चालू असते. 


8. खालील प्रश्नांची उत्तरे सोदाहरण स्पष्ट करा.

अ. वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना प्रमाणामध्ये काय फरक पडतो ? 

उत्तर :

i) ऊर्जेचे प्रमाण वनस्पतीकडे खूप जास्त असते. प्रत्येक पोषण पातळीतून ऊर्जेचे हस्तांतरण होत असतांना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. 

उदा. जलीय ऊर्जा मनोरा.



आ. परिसंस्थेमधील ऊर्जाप्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो ? का ?

उत्तर :

परिसंस्थेतील हरित वनस्पतींनी शोषून घेतलेली सौर ऊर्जा अन्नाच्या रुपात साठवली जाते व पुढच्या पातळीला हस्तांतरीत केली जाते. यांच्या मृत शरीरात साठवलेली ही ऊर्जा पुढे विघटकांमार्फत उष्णतेच्या रूपाने बाहेर टाकली जाते. परंतु यातील कोणतीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही म्हणजें ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक असते.

या उलट पोषकद्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा असतो. निसर्गातून घेतलेली पोषकद्रव्ये पुन्हा पुनर्वापरासाठी निसर्गाला परत केली जातात.

Previous Post Next Post