संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय
संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी
संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही.
अ) अमेरिका
ब) रशिया
क) जर्मनी
ड) चीन
उत्तर :
जर्मनी
2) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.
अ) युनिसेफ
ब) युनेस्को
क) विश्वस्त मंडळ
ड) रेडक्राॅस
उत्तर :
युनिसेफ
3) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या -
अ) १९०
ब) १९३
क) १९८
ड) १९९
उत्तर :
१९३
2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे. कारण - i) आमसभेत पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही.
ii) आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते. म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.
2) संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.
उत्तर :
हे विधान चूक आहे. कारण - संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो.
3) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो
उत्तर :
हे विधान चूक आहे. कारण - i) चीन हा सुरक्षा समितीचा कायम सदस्य आहेत.
ii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे.
iii) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकत नाही.
4) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे. कारण - i) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झाला होतात.
ii) निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता.
iii) संयुक्त राष्ट्रांमध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे.
iv) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे. त्यासोबतच स्त्री सैनिकांची शांतिसेना पाठवली आहे. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) नकाराधिकार
उत्तर :
i) सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात.
ii) अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे.
iii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते.
iv) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही.
v) अर्थात सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या धाराला नकाराधिकार म्हणतात.
2) युनिसेफ
i) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय.
ii) यूनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे.
iii) लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते.
iv) युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
4. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा.
उत्तर :
संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहे
i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आतंरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.
ii) पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.
2) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते ?
उत्तर :
i) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते.
ii) तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात.
iii) संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना याप्रकारची भूमिका बजावते.
3) संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा.
उत्तर :
संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत.
i) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
ii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गानि सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.
iii) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.
iv) याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य चाढवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.
5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
1) संयुक्त राष्ट्रांच्या घटकशांखाविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा.
| |||
|
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
2) संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
2) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा.
उत्तर :
3) संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा.
उत्तर :