अवकाश निरीक्षण दुर्बिणी स्वाध्याय

अवकाश निरीक्षण दुर्बिणी स्वाध्याय

अवकाश निरीक्षण दुर्बिणी स्वाध्याय

अवकाश निरीक्षण दुर्बिणी स्वाध्याय इयत्ता नववी

अवकाश निरीक्षण दुर्बिणी स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान


1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 

अ.  दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे .................... ते मध्ये असते. 

उत्तर :

दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे 400 nm ते 800 nm मध्ये असते. 


आ. GMRT चे कार्य ................. लहरींवर अवलंबून आहे. 

उत्तर :

GMRT चे कार्य रेडिओ लहरींवर अवलंबून आहे. 


इ. क्ष-किरणांच्या एका दुर्बिणीला .................. या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे. 

उत्तर :

क्ष-किरणांच्या एका दुर्बिणीला चंद्रशेखर सुब्रमण्यम या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे. 


ई. अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम ................... या शास्त्रज्ञाने केला. 

उत्तर :

अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम गॅलिलीओ या शास्त्रज्ञाने केला. 


उ. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिण .................. येथे स्थित आहे. 

उत्तर :

भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिण नैनिताल येथे स्थित आहे. 


2. जोड्या लावा. 

 'अ' गट 

'ब' गट  

1) क्ष-किरण

2) दृश्य प्रकाश दुर्बिण

3) भारतीय रेडिओ दुर्बिण

4) कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण 

अ) GMRT

आ) इस्त्रो

इ) हबल

ई) चंद्रा

उत्तर :

 'अ' गट 

'ब' गट  

1) क्ष-किरण

2) दृश्य प्रकाश दुर्बिण

3) भारतीय रेडिओ दुर्बिण

4) कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण 

ड) चंद्रा

क) हबल

अ) GMRT

ब) इस्त्रो



3. भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या ? या अडचणी कशा दूर करता येतात ?

उत्तर :

अवकाशातून दृश्य प्रकाश वातावरणातून प्रवास करून पृथ्वीतलावर पोहोचतो. या प्रवासादरम्यान या प्रकाशाचे वातावरण शोषण होते व आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. दुसरी अडचण अशी की वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्यप्रकाश किरण स्थिर राहत नाहीत. तसेच दिवसा सूर्यप्रकाश असल्याने आकाश निरीक्षण शक्य होत नाही. ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टी सुद्धा आकाश निरीक्षणात अडथळा आणतात.

या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात. ह्या अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर दृश्य प्रकाश दुर्बिण अवकाशातच बसवायला हवी.


4. अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे. त्याची रेखाकृती काढा. 

उत्तर :

अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून परावर्तक दुर्बिण बनवणे शक्य आहे. 

5. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा.

अ. चित्रात दाखवलेली दुर्बिण कोणत्या पद्धतीची आहे ?

उत्तर :

चित्रात दाखवलेली दुर्बिण न्यूटन पद्धतीची आहे. 


आ.  दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या. 

उत्तर :

इ. दुर्बिण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे ?

उत्तर :

दुर्बिण अंतर्वक्र आरशावर आधारित आहे. 


ई. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे. 

उत्तर :

या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बिण आहे. 


उ. वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते ?

उत्तर :

i) अवकाशातून येणारे प्रकाशकिरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तीत होतात. 

ii) हे परावर्तीत किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. तेथे असलेल्या 'नेत्रिका' नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित प्रतिमा पाहू शकतो. 


6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ.  गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.   

उत्तर :

या दुर्बिणीमध्ये दोन किंवा अधिक भिंगाचा वापर केलेला असतो. खगोलीय वस्तूंपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जावा म्हणून पदार्थीय भिंग मोठ्या आकाराचे असते. या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची विशाल प्रतिमा तयार करणारे भिंग म्हणजेच नेत्रिका भिंग लहान आकाराचे असते, प्रकाशकिरणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणात जाताना आपला मार्ग बदलतात. भिंगाच्या साहाय्याने वस्तूच्या प्रतिमांची निर्मिती होते.


आ. रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. 

उत्तर :

रेडिओ दुर्बिण एका विशिष्ट आकाराच्या डिश पासून अथवा अशा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. दृश्य - प्रकाश दुर्बिणी प्रमाणेच या डिशच्या वक्रपृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभीकेंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. तथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र बसवलेले असते. यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून या रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो.

रेडिओ दुर्बिणीची रचना - रेडिओ दुर्बिण ही 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणींचा समूह आहे. यातील प्रत्येक दुर्बिणीचा व्यास 45 मीटर आहे या दुर्बिणीला महाकाय दुर्बिण म्हटले आहे. याचे कारण म्हणजे यातील 30 दुर्बिणींची रचना 25 किमी. पसरलेल्या क्षेत्रात केली आहे. ही रचना म्हणजे जणू काही 25 किमी व्यास असलेली दुर्बिणच होय.


इ. दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभरण्यात येतात ?

उत्तर :

अवकाशातून येणारा दृश्य प्रकाशाचे वातावरणात शोषण होते व प्रकाशाची तीव्रता कमी होते.

वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे त्यातून येणारे दृश्यप्रकाश किरण स्थिर राहात नाही. तसेच ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टी आकाश निरीक्षणात अडथळा आणतात. या अडचणी कमी करण्यासाठी या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी उभारण्यात येतात.


ई.  क्ष-किरणांची दुर्बिण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही ?

उत्तर :

i) क्ष-किरण दुर्बिण ही अवकाशातील तारे व दीर्घिका यांच्या विषयी माहिती मिळवण्यास उपयोगी आहे. 

ii) वेगवेगळ्या स्वरूपातील प्रकाश किरणे अवकाशातील खगोलांपासून पृथ्वीकडे येत असतात. परंतु क्ष-किरणे पृथ्वीच्या वातावरणाच्या अडथळ्यांमुळे पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने तापमानाचा व तेथील दाबाचा अडथळा पृथ्वीवर असतो. त्यामुळे क्ष-किरणांची दुर्बिण पृथ्वीवर कार्यरत होऊ शकत नाही.

Previous Post Next Post