आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय
आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय इयत्ता नववी
आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान
1. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(आनुवंश, लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन, गुणसुत्रे, डी. एन. ए, आर. एन. ए, जनुक)
अ. आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून .................. आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात.
उत्तर :
आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून जनुकांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात.
आ. पुनरुत्पादनाच्या ................. प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत सूक्ष्म भेद असतात.
उत्तर :
पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत सूक्ष्म भेद असतात.
इ. सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे ................... होय.
उत्तर :
सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसुत्रे होय.
ई. गुणसुत्रे मुख्यत: ................... नी बनलेली असतात.
उत्तर :
गुणसुत्रे मुख्यत: डी. एन. ए. नी बनलेली असतात.
उ. पुनरूत्पादनाच्या ...................... प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेद जास्त असतात.
उत्तर :
पुनरूत्पादनाच्या लैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेद जास्त असतात.
2. स्पष्टीकरण लिहा.
अ. मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा.
उत्तर :
मेंडेलेने विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एकसंकर म्हणतात.
यावरून मेंडेलने असे प्रतिपादन केले की, लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीने आढळतात.
आ. मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा.
उत्तर :
द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश होतो.
मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाचवेळी वापरुन संकरणाचे आणखी प्रयोग केले. यात गोल-पिवळ्या (RRYY) बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या (rryy) बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजाचा रंग व प्रकार अशा दोन लक्षणांचा समावेश आहे.
P1 पिढीची युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते म्हणजेच RRYY झाडांपासून RR व YY अशी युग्मके तयार होत नाहीत तर फक्त RY प्रकारची युग्मके तयार होतात तसेच rryy झाडांपासून ry युग्मके तयार होतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते.
इ. मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा.
उत्तर :
मेंडेलची एकसंकर व द्विसंकर यातील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत्.
i) विरुद्ध लक्षणांची जोडी
ii) रंग आणि प्रकार
iii) तयार होणारी युग्मके
iv) जनुकांचे प्रतिनिधित्व
ई. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे.
उत्तर :
i) जनुकीय विकार हा संक्रमित होणारा रोग नाही.
ii) आई व वडिलांकडून त्यांच्या संततीमध्ये जनुकीय विकार येतो.
iii) जनुकीय विकार असणाऱ्या अपत्यांना आधार आवश्यक असतो. त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर :
सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय.
गुणसूत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.
i) मध्यकेंद्री (Metacentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे 'V' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.
ii) उपमध्यकेंद्री (Sub-metacentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे 'L' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.
iii) अग्रकेंद्री (Acrocentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो. व हे 'J' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.
iv) अंत्यकेंद्री (Telocentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘I’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते.
आ. डी.एन.ए रेणूची रचना स्पष्ट करा.
उत्तर :
i) डी.एन.ए रेणूची रचना सर्व सजीवांत सारखीच असते. डी.एन.ए रेणूतील प्रत्येक धागा न्युक्लीओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो.
ii) नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनीन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनीन व ग्वानीन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसीन व थायमीन यांना पिरिमिडीन्स म्हणतात.
iii) न्युक्लीओटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो.
iv) नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्युक्लिओटाइडसुद्धा चार प्रकारचे असतात.
v) डी.एन.ए. च्या रेणूमध्ये न्युक्लीओटाइडची रचना साखळीसारखी असते. डी.एन.ए चे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील दोन खांब. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हाइड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनीनची थायमीन बरोबर व ग्वानीनची सायटोसीन बरोबर जोडी होते.
इ. डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर :
प्रत्येक व्यक्तीत असलेल्या डी.एन.ए च्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो.
ई. आर.एन.ए. ची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा.
उत्तर :
अ) आर.एन.ए ची रचना - हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल होय. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन ॲडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्युक्लीक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्युक्लिओटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आर.एन.ए चा महारेणू तयार होतो.
ब) आर.एन.ए चे कार्य व प्रकार
i) रायबोझोमल आर.एन.ए (rRNA) - रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आर.एन.ए चा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात.
ii) मेसेंजर आर.एन.ए (mRNA) - पेशीकेंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डी.एन.ए च्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा 'दूत रेणू'.
iii) ट्रान्सफर आर.एन.ए (tRAN) - mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा आर.एन.ए चा रेणू असतो.
उ. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे ?
उत्तर :
सिकलसेल चे निदान करण्यासाठी कारण हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.
4. थोडक्यात माहिती लिहा.
अ. डाऊन्स सिंड्रोम /मंगोलिकता
उत्तर :
i) गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. ही गुणसूत्रीय विकृती आहे.
ii) यात गुणसूत्ररचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 (एकाधिक द्विगुणितता 21) असेही म्हणतात.
iii) कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21 व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात.
iv) मानसिक वाढ खुंटणे, हे सर्वांत जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. तसेच कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखुड बोटे, आडवी एकच हस्तरेखा, डोक्यावर विरळं केस, आयुर्मान 10 ते 20 वर्षे असते.
आ. एकजनुकीय विकृती
उत्तर :
i) एखाद्या सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याचे जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात.
ii) संदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात.
iii) या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिनसन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमीया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टीक फायब्रॉसिस, वर्णकहीनता, हीमोफेलिया, रातांधळेपणा इ. आहेत.
इ. सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना
उत्तर :
लक्षणे – सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
उपाययोजना - i) हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी.
ii) सिकलसेल वाहक / पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक/पिडित व्यक्तीशी लग्न टाळावे.
iii) सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी.
5. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे ?
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
तंतूकणिका विकृती | भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. | |
बहुघटकीय विकृती | रक्तातील ग्लुकोजवर परिणाम | |
एकजनुकीय विकृती | ||
44 + xxy | पुरुष प्रजननक्षम नसतात. |
6. सहसंबंध लिहा.
अ. 44 + X : टर्नर सिंड्रोम :: 44 + XXY : .............
उत्तर :
44 + X : टर्नर सिंड्रोम :: 44 + XXY : क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम
आ. 3 : 1 एकसंकर :: 9:3:3:1 ..................
उत्तर :
3 : 1 एकसंकर :: 9:3:3:1 द्विसंकर
इ. स्त्रिया : टर्नर सिंड्रोम :: पुरुष :
उत्तर :
स्त्रिया : टर्नर सिंड्रोम :: पुरुष : क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम
7. आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघतक्ता तयार करा.
उत्तर :