जैवतंत्रज्ञानाची ओळख स्वाध्याय
जैवतंत्रज्ञानाची ओळख स्वाध्याय इयत्ता नववी
जैवतंत्रज्ञानाची ओळख स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान
1. खालील प्रत्येक विधान चूक आहे. या विधानांतील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा.
अ. श्वसनमार्गामध्ये सरल पट्टकी अभिस्तर ऊती असते.
उत्तर :
श्वसनमार्गामध्ये रोमक अभिस्तर ऊती असते.
आ. वृक्कांमध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते.
उत्तर :
वृक्कांमध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असते.
इ. हरितऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते.
उत्तर :
वायू ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते.
ई. पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात.
उत्तर :
अपट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात.
उ. दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते.
उत्तर :
हरित ऊतीमध्ये हरितद्रव्य असते.
2. गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा.
अ. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढऊती, विभाजी ऊती
उत्तर :
विभाजी ऊती - उर्वरित सर्व ऊती या स्थायी ऊतींचे प्रकार आहेत.
आ. अभिस्तर, स्थायूतंतू, चेतातंतू, अपित्वचा
उत्तर :
अपित्वचा - उर्वरित सर्व ऊती या प्राण्यांच्या ऊती आहेत.
इ. कास्थी, अस्थी, स्नायूरज्जू, ह्रदय स्नायू
उत्तर :
ह्रदय स्नायू - उर्वरित सर्व संयोजी ऊती आहेत.
3. खालील ऊतींची नावे लिहा.
अ. तोंडाच्या आतील स्तरातील ऊती.
उत्तर :
सरल पट्टकी अभिस्तर ऊती
आ. स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती.
उत्तर :
स्नायूरज्जू संयोजी ऊती
इ. वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती.
उत्तर :
प्ररोह विभाजी ऊती
ई. खोडाचा घेर वाढविणारी ऊती.
उत्तर :
पार्श्वविभाजी ऊती
4. फरक लिहा.
वनस्पतींमधील सरल ऊती व सरल ऊती
उत्तर :
|
|
|
ii) जलवाहिनी व रसवाहिनी हे जटिल ऊतींचे प्रकार आहेत. |
5. टिपा लिहा.
अ. विभाजी ऊती
उत्तर :
i) वनस्पतींच्या ठरावीक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागातच वाढ सुरू होते.
ii) या ऊतीच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशी भित्तीका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.
iii) या पेशींमध्ये बहुदा रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. याचे तीन प्रकार पडतात.
प्ररोह विभाजी ऊती - मूळ व खोडांच्या टोकाशी असतात.
आंतरीय विभाजी ऊती - पानांच्या देठाच्या व फांदयांच्या तळाशी असतात.
पार्श्व विभाजी ऊती - मूळ व खोडाच्या पार्श्व भागात असतात.
आ. जलवाहिनी
उत्तर :
i) जलवाहिनी ही जटील स्थायी ऊतीचा प्रकार आहे.
ii) जलवाहिन्या या जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या आहेत.
iii) वाहिनिका, वाहिन्या व तंतू या मृत पेशी असतात तर जलवाहिनी ऊती या जिवंत पेशी असतात. जलवाहिन्याचे असे प्रकार पडतात.
iv) एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी जलवाहिन्याची रचना असते. पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात. हे यांचे कार्य असते.
इ. पट्टकी स्नायू
उत्तर :
i) पट्टकी स्नायू स्नायूऊतीचा प्रकार आहे.
ii) पट्टकी स्नायूंच्या पेशी लांबट, दंडगोलाकार अशाखीय व बहकेंद्रकी पेशी असतात.
iii) या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. हाडांना जोडलेले असल्याने यांना 'कंकाल स्नायू' म्हणतात. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून 'ऐच्छिक स्नायू' ही म्हणतात.
iv) हातपाय हलवणे. धावणे बोलणे, या हालचाली घडवून आणणारे हे स्नायू आहे.
ई. शेतीपूरक व्यवसाय
उत्तर :
(i) पशुसंवर्धन (ii) कुक्कुटपालन (iii) रेशीम (iv) उद्योग हे शेतीपूरक व्यवसाय आहेत.
i) पशुसंवर्धन - आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. जसे दूध देणाऱ्या गाई, म्हशी तसेच ओझी ओढणारे बैल, रेडे इत्यादी.
साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गाई व जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गाईचा वापर दूध उत्पादनासाठी करतात.
ii) कुक्कुटपालन - अंडी व मास देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते त्याला कुक्कुटपालन म्हणतात.
iii) रेशीम उद्योग - रेशीम उद्योगासाठी रेशीम किडे पाळले जातात. रेशीम किड्याच्या जीवनचक्रात अंडी अळी कोश - पतंग ह्या चार अवस्था - असतात. किड्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो. या पासून तयार होणाऱ्या रेशीम धाग्यांपासून निरनिराळी वस्त्रे बनतात.
उ. जनुकीय अभियांत्रिकी
उत्तर :
i) जनुकीय अभियांत्रिकी हे जैवतंत्रज्ञानातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे.
ii) जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे या क्षेत्रात होतो.
ऊ. रेशीम उद्योग
उत्तर :
i) रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. 'बॉम्बिक्स मोरी' जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो.
ii) मादीने घातलेली अंडी कृत्रिमरित्या उबवून उबवणीचा काळ कमी करून अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात.
iii) त्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो. हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीमकोष तयार करते.
iv) या कोषांचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसापूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे अळी मरते व रेशीमतंतू सैल होतात ते सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो.
6. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम स्पष्ट करा.
उत्तर :
नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे. मानवी फायदयांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर, घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात.
जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम - i) पिकांच्या डी.एन.ए मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जात आहेत. नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमुळे निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात.
ii) जैवतंत्रज्ञानामुळे GM सुधारित प्रजाती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान हे वातावरणीय ताण नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत.
iii) उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातींमध्ये असल्याने जंतूनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो.
iv) GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषणमूल्यांत वाढ होते.
7. जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात ? का ?
उत्तर :
i) जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन तंत्रांचा वापर करतात.
ii) यांचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे या क्षेत्रात होतो.
iii) ऊती संवर्धनात सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात पेशी किंवा ऊतींची वाढ करणे.
8. 'कृषी पर्यटन' या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा. तो वर्गात गटामध्ये सादर करा.
उत्तर :
कृषिपर्यटन प्रकल्प - शेतावरील फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, आनंद, शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकऱ्यांने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषिपर्यटन होय.
महाराष्ट्र राज्य 'कृषी पर्यटन' चळवळ सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे. पर्यटन हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. भारतीय शेतीचे जागतिक महत्त्व आणि तिची विविधता यामुळे बहुसंख्य पर्यटकांची पाऊले आता 'कृषीपर्यटन' केंद्राकडे वळू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आज कृषिपर्यटन केंद्रे बहरू लागली आहे. शेती करता करता चार पैसे कमविण्याची सभी या व्यवसायातून मिळत आहे.
'मोराची मुखई' कृषिपर्यटन स्थळ - शिरूर तालुक्यामध्ये मोराचे दर्शन विविध गावामध्ये होऊ लागले आहे. त्यापैकी मुखई हे गाव 'मोराची मुखई' म्हणून प्रसिद्धीस येत आहे. या गावात तब्बल 500 पेक्षा जास्त मोर असल्याने गावात कृषिपर्यटन विकसित होत आहे. या गावाला वेळ नदीचा विस्तीर्ण किनारा व चासकमानच्या उजव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्याने मोरांची संख्या वाढत चालली आहे. उसाचे फड, केळींच्या बागा, सिताफळ बागा, संत्री बागा, नारळांची बन आणि मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांपासून कितीतरी आत नीरव शांततेचा परिसर असलेल्या या भागात तब्बल 500 पेक्षा जास्त मोर व लांडोर वास्तव्यास आहे. गावकऱ्याच्या प्रेमामुळे येथील मोरही माणसाळलेले आहे. भरगच्च नारळीच्या बनात मोरांची प्रत्यक्ष भेट, गावरान जेवण, एक एकर क्षेत्रातील तब्बल सात तलावांमध्ये नौका विहार, ट्रॅक्टर फेरी, बैलगाडी फेरी, मनसोक्त मासेमारी आणि केळी, संत्री, चिकू, डाळींब, हुरड्यासह एथेच्छ बेत अशा सर्व बाबी पर्यटकांना सहज उपलब्ध होतात.
9. ऊती म्हणजे काय हे सांगून ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात.
सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन असे म्हणतात. ऊती संवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो.
10. मेंढी हे पशुधन आहे. या वाक्याच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा.
उत्तर :
मेंढी हे पशुधन आहे. कारण त्याचा शेतीसाठी उपयोग होतो. मेंढी पासून मांस, कातडे, मटन, दूध, लोकर यांसारखे उपयुक्त पदार्थ व वस्तू मिळतात. मेंढीपासून मिळणारी लोकर ही सर्वांत जास्त वापरली जाते. म्हणून मेंढी हे पशुधन आहे.