उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय
उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता नववी
उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान
1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
(मायकोटाॅक्झीन्स, कालिकायन, रायझोबिअम)
अ. यीस्ट ................. पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते.
उत्तर :
यीस्ट कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते.
स्पष्टीकरण - यीस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. यीस्ट हे एकपेशीय कवक असून त्याची पेशी दृश्यकेंद्रकी प्रकारची असते.
आ. बुरशीजन्य विषारी रसायनांना .................. म्हणतात.
उत्तर :
बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटाॅक्झीन्स म्हणतात.
स्पष्टीकरण - मायकोटाॅक्झीन्स ओलसर अन्नात वाढतात. मायकोटाॅक्झीन्स अन्नातील पोषणद्रव्ये शोषून स्वत:ची वाढ व प्रजनन करतात. ही विषारी रसायने अन्नात मिसळती जाऊन अन्न विषारी होते.
इ. शिंबावर्गीय वनस्पती .................... मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.
उत्तर :
शिंबावर्गीय वनस्पती रायझोबिअम मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.
स्पष्टीकरण - रायझोबिअम हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. पण नायट्रोजन स्थितीकरणासाठी शिंबावर्गीय वनस्पतींची यजमान म्हणून गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळेच प्रथिनांची उत्कृष्ट स्त्रोत ठरतात.
2. खालील पदार्थामध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आढळतात. त्यांची नावे लिहा.
दही, पाव, कडधान्यांच्या मुळांवरील गाठी, इडली, डोसा, खराब झालेली बटाट्याची भाजी.
उत्तर :
i) दही - लॅक्टोबॅसिलाय
ii) पाव - यीस्ट
iii) कडधान्यांच्या मुळांवरील गाठी - रायझोबियम
iv) इडली - ल्युकोनोस्टॉक आणि लॅक्टोबॅसिलाय
v) डोसा - ल्युकोनोस्टॉक आणि लॅक्टोबॅसिलाय
vi) खराब झालेली बटाट्याची भाजी - क्लाॅस्ट्रिडीअम
3. वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे ?
अ. न्युमोनिया, घटसर्प, कांजिण्या, कॉलरा
उत्तर :
कॉलरा
कारण - इतर सर्व रोग हे दुषित हवेमार्फत होणारे रोग आहेत, तर कॉलरा हा दुषित अन्न व पाण्यापासून होणारा रोग आहे.
आ. लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व, क्लाॅस्ट्रिडिअम
उत्तर :
क्लाॅस्ट्रिडिअम
कारण - इतर सर्व सूक्ष्मजीव हे उपयुक्त आहेत. तर क्लाॅस्ट्रिडिअम हा जीवाणू आहे.
इ. मुळकूज, तांबेरा, रुबेला, मोझॅइक
उत्तर :
रुबेला
कारण - इतर सर्व रोग हे वनस्पतींना होणारे रोग आहेत. तर रुबेला हा मानवाला होणारा विषाणूजन्य रोग आहे.
4. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.
उत्तर :
कारण - काही सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अधिक तापमानाची गरज असते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे वरणात किण्वन प्रक्रिया जलद गतीने होऊन काही विषारी पदार्थ व कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते. त्यामुळे वरणावर फेस जमा झालेला दिसतो.
आ. कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.
उत्तर :
कारण - डांबराच्या गोळ्यामुळे कवकवर्गीय सूक्ष्मजीव मुख्यत्वे बुरशीची वाढ मंदावते. म्हणून कपड्यांमध्ये सूक्ष्मजीव किंवा बुरशी लागू नये व त्यांचा वास येऊ नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.
5. कवकजन्य रोगाच्या प्रसाराची माध्यमे व प्रतिबंधक उपाय लिहा.
उत्तर :
प्रसाराची माध्यमे - i) दुषित पाणी, अन्न
ii) हवेत येणारे सूक्ष्म थेंब
iii) रोग्याशी व त्याच्या वस्तूंशी संपर्क
iv) दूध
v) अस्वच्छ परिसर
प्रतिबंधक उपाय - i) स्वच्छ गाळलेले पाणी
ii) अन्न झाकून ठेवावे
iii) स्वच्छता राखणे
iv) रोग्याशी संपर्क टाळणे
v) परिसर स्वच्छ ठेवणे
6. जोड्या जुळवा.
|
|
|
अ) अन्न विषबाधा ब) नायट्रोजन स्थितीकरण क) बेकरी उत्पादने ड) प्रतिजैविक निर्मिती |
उत्तर :
|
|
|
ब) नायट्रोजन स्थितीकरण अ) अन्न विषबाधा ड) प्रतिजैविक निर्मिती क) बेकरी उत्पादने |
अ. लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात ? का ?
उत्तर :
लहान मुलांना पुढील लसी दिल्या जातात.
i) बीसीजी - क्षयरोग
ii) त्रिगुणी - घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात
iii) द्विगुणी - घटसर्प, धनुर्वात
iv) कावीळ
v) पोलिओ
लसीकरण एका प्रतिबंधात्मक उपाय आहे. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी लहान मुलांना लस दिली जाते. लस दिल्याने त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आ. लस कशी तयार केली जाते ?
उत्तर :
सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या रसायनांपासूनच लस तयार केली जाते. ज्या सूक्ष्मजीवामुळे एखादा रोग होतो त्याच सूक्ष्मजीवांपासून त्याच रोगावरील लस तयार केली जाते. लस तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता कमी केली जाते किंवा त्यांना मारून लस बनविली जाते.
इ. प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते ?
उत्तर :
सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविक होत. यांमुळे जीवाणूंचा नाश होऊन रोग होण्यास प्रतिबंध होतो. या प्रकारे रोगनिवारण होते.
प्रतिजैविके मुख्यत: जीवाणूंविरुद्ध कार्य करतात.
ई. मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का ? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का ?
उत्तर :
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात. दोघांनाही दिलेली प्रतिजैविके ही वेगवेगळी असतात.
उ. विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात ?
उत्तर :
काही विशिष्ट सूक्ष्मजीवांतच विशिष्ट प्रतिजैवके तयार करण्याची क्षमता असते. तसेच प्रतिजैविकात विशिष्ट सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची क्षमता असते. शिवाय लस तयार करण्यासाठी लागणाऱ्या सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता कमी करावी लागते अथवा सूक्ष्मजीवांना मारावे लागते. भविष्यात पुन्हा लस निर्मिती करावयाची असेल तर सूक्ष्मजीवांची गरज भासेल त्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे जतन करावे लागतात.
8. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय ?
उत्तर :
काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.
उदा. अम्पीसिलीन, अँमॉक्झीसीलीन
आ. किण्वन म्हणजे काय ?
उत्तर :
स्वत:चे पोषण करताना यीस्टच्या पेशी कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन म्हणतात.
इ. व्याख्या लिहा. 'प्रतिजैविक'
उत्तर :
सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारीजीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे 'प्रतिजैविके' होत.