वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय
इयत्ता नववी विज्ञान वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय
इयत्ता नववी वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय
1. 'अ' 'ब' व 'क' या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा.
उत्तर :
मऊ व तंतूरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते.
कारण - या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. यांना मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. त्यामुळे पाण्यात टिकून राहण्यासाठी त्यांचे शरीर मऊ व तंतूरूपी असते.
आ) वनस्पतीसृष्टीचे उभयचर .................. गटाला म्हटले जाते.
उत्तर :
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.
कारण - ब्रायोफायटा या गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते.
उत्तर :
टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बिजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
कारण - टेरीडोफायटा हा गट बीजपत्री व बीजाणूद्वारेच होते. परंतु काही वनस्पतींमध्ये प्रजननसंस्था अप्रकट असली तरी एमक निर्मिती होते.
ई) नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी ................ ही वनस्पती आहे.
उत्तर :
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे.
कारण - या वनस्पती सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींना फांद्या नसुन पानाचा मुकूट तयार झालेला ससतो. म्हणून नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर -
बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
i) या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात.
ii) बियांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.
iii) बिया रुजतांना काही काळ हा अन्नसाठा भ्रूणांच्या वाढीसाठी वापरला जातो.
iv) या वनस्पतीमध्ये बिया फळांमध्ये झाकलेल्या असतात किंवा नसतात. या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग पडतात.
आ. एकबीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
|
|
ii) या वनस्पतींमध्ये ठळक प्राथमिक कठीण खोड असते. मूळ म्हणजे सोटमूळ असते. iii) बहुतांश वनस्पतींचे मजबूत व कठीण खोड असते. उदा. वटवृक्ष iv) यांच्या पानांवरती सम शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. |
ii) या वनस्पतींमध्ये तंतूमुळे असतात. iii) या वनस्पतींचे खोड नाजूक, पोकळ, आभासी चकतीसारखे असतात. उदा. बांबूचे पोकळ खोड, केळीचे आभासी, कांद्याचे चकतीसारखे खोड. iv) यांच्या पानांवरती समांतर शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फले त्रिभागी असतात. |
इ. नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर :
i) नेचे ही वनस्पती टेरीडोफायटा या गटातील आहे.
ii) या वनस्पतीला मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात.
iii) या वनस्पतीतील अन्न व पाणी वहनासाठी स्वतंत्र ऊती आहेत.
iv) नेचे या वनस्पतीला फुले व फळे येत रहीत.
v) त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बिजाणूद्वारे प्रजनन होते.
ई. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा.
उत्तर :
i) स्पायरोगायरा ही वनस्पती गोड्या पाण्यात वाढते.
ii) या वनस्पतीला मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात.
iii) स्पायरोगायरा ही बहुपेशीय वनस्पती आहे.
iv) या वनस्पतीचे शरीर मऊ व व तंतूरूपी असते.
v) प्रत्येक शीत सर्पिल हरितलवक असते. ज्याच्या मदतीने ही वनस्पती स्वतःचे अन्न तयार करते.
उ. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
i) या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हणतात.
ii) या वनस्पती ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.
iii) या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.
iv) या वनस्पतींचे प्रजनन बिजाणूनिर्मितीने होते.
v) या विभागातील प वनस्पतींची रचना चपटी रीबीनीसारखी लांब असते.
vi) या वनस्पतींना खरी मुळ, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव 'मुलाभ' असतात.
vii) पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.
4. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा मर्केशिया, फ्युनारिया, नेचे, स्पायरोगायरा.
उत्तर :
i) मर्केशिया -
ही वनस्पती ब्रायोफायटा या गटात मोडते ही वनस्पती बहुपेशीय व स्वयंपोषी असते. वनस्पतीची रचना चपटी रीबिनीसारखी असते. मार्केशिया या वनस्पतीला मुळांसारखे दिसणारे अवयव 'मुलाभ' असतात. या वनस्पतीला पाने नसतात तर पानासारखे अवयव असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी ऊती नसतात.
ii) फ्युनारिया -
ही वनस्पती ब्रायोफायटा या गटातील आहे. ही वनस्पती बहुपेशीय, स्वयंपोषी असते. या वनस्पतीला खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानासारख्या रचना असतात व मुळासारखे अवयव मुलाभ असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी ऊती नसतात.
iii) नेचे -
नेचे ही वनस्पती टेरीडोफायटा या गटातील आहे. या वनस्पतीला मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. या वनस्पतीतील अन्न व पाणी वहनासाठी स्वतंत्र ऊती आहेत. नेचे या वनस्पतीला फुले व फळे येत रहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बिजाणूद्वारे प्रजनन होते.
iv) स्पायरोगायरा -
स्पायरोगायरा ही वनस्पती गोड्या पाण्यात वाढते. या वनस्पतीला मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. स्पायरोगायरा ही बहुपेशीय वनस्पती आहे. या वनस्पतीचे शरीर मऊ व व तंतूरूपी असते. प्रत्येक शीत सर्पिल हरितलवक असते. ज्याच्या मदतीने ही वनस्पती स्वतःचे अन्न तयार करते.
5. परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.
उत्तर :
एकबीजपत्री वनस्पती - उदा. मका
i) मका ही एकबीजपत्री वनस्पती आहे.
ii) या वनस्पतीला तंतूमुळे असतात.
iii) याचे खोड पोकळ बांबूसारखे असते.
iv) पानांवरील शिराविन्यास हा समांतर शिराविन्यास असतो.
द्विबीजपत्री वनस्पती - उदा. वाटाणा
ii) वाटाण्याला दोन बीजपत्रे असतात.
iii) या वनस्पतीला ठळक प्राथमिक मूळ (सोटमूळ) असते.
iv) या वनस्पतीचे खोड मजबूत असते.
v) पानांवर जाळीदार शिराविन्यास असतो.
6. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ? ते सकारण लिहा.
उत्तर :
वनस्पतींचे वर्गीकरण करताना पुढील बाबींचा विचार केला जातो
i) वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत.
ii) पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था आहे किंवा नाही.
iii) वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे.
iv) बियांवर फळांचे आवरण आहे की नाही.
v) बियांमधील बिजपत्राची संख्या किती आहे.
वनस्पती वर्गीकरणाच्या उच्चस्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यांवरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बिजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.