पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय
इयत्ता नववी विज्ञान पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय
पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता नववी
1. 'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.
|
|
|
|
उत्तर :
क) किरणोत्सारी पदार्थ ड) वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली इ) बॅडेज, कापूस, सुया इत्यादी ब) रसायने, रंग, राख इत्यादी अ) काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी |
2. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.
( भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा , वेधशाळा )
अ. जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक ............... हा आहे.
उत्तर :
जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक भौगोलिक अनुकूलता हा आहे.
समर्थन - भौगोलिक अनुकूलतेमुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे जैवविविधता भौगोलिक अनुकूलतेवर अवलंबून असते.
आ. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन ................. होय.
उत्तर :
कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन हवा होय.
समर्थन - हवामान हे हवेच्या त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून असते. हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात.
इ. मानवाने कितीही प्रगती केली तरी ................. चा विचार करावाच लागतो.
उत्तर :
मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामान चा विचार करावाच लागतो.
समर्थन - हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. भारतासारख्या शेतीप्रधान देशांसाठी हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विमानासाठी धावपट्ट्या बनवणे. बंदरनिर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदि योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा विचार केला जातो.
ई. हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना ................... असे म्हणतात.
उत्तर :
हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात.
समर्थन - यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा ?
उत्तर :
i) रक्तस्त्राव - जर आपद्ग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्त्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे दयावा.
ii) अस्थिभग व मणक्यावर आघात - जर आपद्ग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते. पाठीवर / मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवर ठेवावे.
iii) पोळणे - भाजणे - जर आपद्ग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर चंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते.
iv) लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार - अशा परिस्थितीत RICE उपाययोजना करावी.
Rest - आपद्ग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे.
Ice - आपद्ग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे.
Compression - बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा.
Elevate - मार लागलेला भाग उंचावून ठेवावा.
v) श्वसनमार्ग - आपद्ग्रस्त व्यक्तीला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे. त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
vi) श्वासोच्छवास - जर श्वासोच्छवास बंद झाला तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास दयावा.
आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.
उत्तर :
शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत.
i) कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण - ही कचरा व्यवस्थापनातील प्राथमिक प्रक्रिया आहे. ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आवश्यक आहे.
ii) कंपोस्टिंग (सेंद्रिय खत) - घराभोवतीची जागा, बाग, गच्ची अशा ठिकाणी तुमच्या घरातील कचऱ्याचे विघटन करणे शक्य आहे. घरातील उरलेले अन्न, फळे, भाज्या यांची साले व टाकाऊ भाग, बागेतील कचरा अशा पद्धतीने कुजवल्यास तुमच्या बागेसाठी. शेतीसाठी चांगले खत बनू शकते.
iii) गांडूळ खत निर्मिती - गांडूळांचा वापर करून घनकचऱ्याचे जलद विघटन घडवून आणणारी ही सोपी पद्धत आहे. घनकचऱ्याचे खतात रूपांतर करणारे हे एक प्रभावी तंत्र आहे.
iv) सुरक्षित भूमीभरणाची स्थळे - भूमिभरण स्थळ पाण्याच्या स्थळापासून 2 किमीपेक्षा अधिक अंतरावर निवडावी. भूमिकरण करतांना मिश्र प्रकारचा कचरा एकत्र करू नये. तसेच सुरक्षित भूमिभरण स्थळांमध्ये कचरा टाकण्यापूर्वी माती व प्लास्टिकचे अस्तर घालावे. यामुळे जमीन व पाणी प्रदूषणास आळा असतो.
v) पायरोलिसिस - यात कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन होत असल्याने ही प्रक्रिया वायू व विजनिर्मितीसाठी उपयोगी ठरते. अर्धवट ज्वलनशील कचरा या पद्धतीने जाळला जातो. महानगरपालिकेद्वारे केल्या जाणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत ही शास्त्रीय पद्धत वापरली जाते.
vi) जैववैदयकीय कचरा व्यवस्थापन - जैवभट्टीद्वारे रोगप्रसारक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निर्जंतुकीकरणाची शास्त्रीय पद्धत वापरली जाते. तसेच भट्टीमध्ये घनकचऱ्याचे ज्वलन करून अनावश्यक घनपदार्थ, घन अथवा वायू स्वरूपातील अवशेषांमध्ये रूपांतरित केला जातो.
इ. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा.
उत्तर :
हवामान अंदाज यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
वेधशाळेने वर्तविलेला हवामान अंदाज लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय यांद्वारे अमंलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया होय. उदा. मुसळधार पाऊस, वाळूची वादळे, त्सुनामी इत्यादी संकटांची पूर्वसूचना विविध प्रसिद्धी माध्यमांमधून नागरीकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे मासेमारी व्यवसायिक समुद्रामध्ये जाण्याचे टाळतात.
ई. ई-कचरा घातक का आहे ? याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
ई-कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा होय. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवतांना यामध्ये कॅडमिअम, निकेल, क्रोमियम, एंटीमीनी, आर्सेनिक, बेरिलिअम यांचा उपयोग केला जातो. या वस्तू हवा, माती, पाणी यांमध्ये मिसळून त्यांना विषारी करतात. यांमुळे फुफुसाचे विकार, किडनीचे विकार उद्भवतात. मरक्युरी, कॅडमिअम, फॉस्फरस या घातक वस्तू जाळल्यावर वातावरणात मिसळतात व पर्यावणाचा विनाश करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून ई-कचरा घातक आहे.
उ. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल ?
उत्तर :
i) वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्या.
ii) प्लॅस्टिक व थर्मोकोल यांसारख्या अविघनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे व कापडी पिशव्या, कागदी पिशव्यांचा वापर करणे.
iii) टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे.
iv) दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे.
v) साधनसंपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे.
vi) तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येईल याचे संशोधन करणे.
4. टिपा लिहा.
अ. हवामानशास्त्र
उत्तर :
i) हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय.
ii) यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
आ. हवामानाचे घटक
उत्तर :
i) हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
ii) आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरज तसेच विविध व्यवसाय यांवर हवामानाचा परिणाम होतो.
iii) भारतासारख्या शेतीप्रधान देशांसाठी तर हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विमानासाठी धावपट्ट्या बनवणे, बंदरनिर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदि योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा जसे वाऱ्याची दिशा व गती, तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो.
इ. मान्सून प्रारूप
उत्तर :
i) विविध प्रदेशांत समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता यांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो.
ii) अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे. अशा घटकांन गृहीत धरून एकत्रित अंदाज घेण्यात येतो.
ई. औद्योगिक कचरा
उत्तर :
i) औद्योगिक कचरा म्हणजे विविध कारखान्यामधून निघणारी रसायने, रग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इ. होय.
ii) औद्योगिक कचरा हा पर्यावरणास हानिकारक आहे. कारण यामध्ये जी रसायने नदीत सोडली जातात. त्यामुळे पाणी दूषित होते.
iii) रसायनांमधील गाळ हा नदीत साचला जातो. यामधून निघणारे विषारी वायू ही हवेत मिसळले जाऊन हवा प्रदूषण होते. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परीणाम होतो.
iv) दूषित झालेले पाणी जनावरं पिण्यास वापरतात. त्याचा जनावरांवर विपरीत परिणाम होऊन ती दगावतात. विविध आजार पसरतात. धातूंचे सहजरित्या विघटन होत नाही.
उ. प्लॅस्टिक कचरा
उत्तर :
i) प्लॅस्टिक कचरा हा सुका घनकचरा प्रकारात मोडतो.
ii) प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होतात.
iii) प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचा -हास आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आहे. यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही. म्हणून प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे.
ऊ. प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
उत्तर :
प्रथमोपचाराच्या मूलतत्त्वांमध्ये सुचेतनता आणि पुनरुज्जीवन यांचा समावेश होतो.
i) श्वसनमार्ग (Airway) - आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
ii) श्वासोच्छ्वास (Breathing) - जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास दयावा.
iii) रक्ताभिसरण (Circulation) - जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio-Pulmonary Resuscitation) म्हणतात आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.
5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर :
हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व -
i) दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो.
ii) एखादया प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान साहाय्यभूत ठरते. उदा. काश्मीर मधील लोकांचे राहणीमान हे तेथील हवामानानुसार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे हवामान थंड असल्यामुळे त्यांचे खानपान त्याला अनुसरून असते.
iii) भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. जसे भूपृष्ठांवरील खडाकांचे हवामानाचा परिणाम होऊन ते फुटतात व त्यांचा भुगा होतो. म्हणजेच खडकांतील कणांचे विलगीकरण होते.
iv) मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उदा. शीत कटिबंधात खडकांची विविधता असूनही टुंड्रा मृदा तयार झालेली आढळते.
v) सागरजलाची क्षारता, सागरप्रवाहांची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशीच संबंधित आहेत.
6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळ ते सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
रुग्णाचे वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
i) पाळणा पद्धत - मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यांसाठी उपयुक्त.
ii) पाटुंगळीला मारणे - रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत.
iii) मानवी कुबडी पद्धत - एकाच पायाला जखम /मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे.
iv) खेचून किंवा उचलून नेणे - बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी.
v) चार हातांची बैठक - जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते.
vi) दोन हातांची बैठक - जे रुग्ण आधारासाठी स्वत:चे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात.
vii) स्ट्रेचर - आपत्तीकाळात घाईगडबडीच्या वेळी नेहमीच स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूंचा जसे बांबू दरवाजे, ब्लॅकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे.
सर्व पद्धती वापरताना रुग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्याला प्रत्येक वेळी धीर देणे आवश्यक आहे.
7. फरक स्पष्ट करा.
अ. हवा व हवामान
उत्तर :
हवा | हवामान |
i) हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन अस्थायी स्थिती होय. ii) हवेत अल्पकाळ बदल होतात. iii) हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. iv) हवा ही सतत बदलत असते. |
आ. विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा
उत्तर :
विघटनशील कचरा | अविघटनशील कचरा |
i) या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते. ii) यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब, अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण यांचा समावेश होतो. iii) यालाच आपण ओला घन कचरा म्हणतो. iv) कचऱ्याचे विघटन लवकर होते. | i) या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही. ii) यामध्ये प्लॅस्टिक, धातू यांसारख्या इतर पदारथाचा समावेश होतो. iii) या कचऱ्याला सुका घनकचरा म्हणतात. iv) यापासून खत व इंधन मिळत नाही. v) या कचऱ्याच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो. |