माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय इयत्ता नववी

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान


1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा. 

अ. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ................... मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो. 

उत्तर :

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटर्नल मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो. 

समर्थन - संगणकावर काम करताना इतर प्रक्रिया सी. पी. यू. मध्ये येतात. सी. पी. यू. मध्येच इंटर्नल मेमरी असते. 


आ. शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना .................. चा वापर करता येईल. 

उत्तर :

शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइट चा वापर करता येईल. 

समर्थन - मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइटमध्ये स्टाईड दाखवितांना एकाच वेळी चित्रे, माहिती, व्हिडिओ घेऊ शकतो. 


इ. प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी .............. वापरतात. 

उत्तर :

प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतात.

समर्थन - मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तक्ते, आलेख तयार करणे सोयीचे असते. 


ई. पहिल्या पिढीतील संगणक ................... मुळे बंद पडत होते. 

उत्तर :

पहिल्या पिढीतील संगणक उष्णता निर्मिती मुळे बंद पडत होते. 

समर्थन - पहिल्या पिढीत व्हाॅल्वज वापरले होते. हे व्हाॅल्वज आकाराने मोठे होते. त्यांना वीजही खूप लागायची त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि संगणक बंद पडत असे. 


उ. संगणकास .................. दिला नसेल तर त्याचे कार्य चालणारा नाही. 

उत्तर :

संगणकास विद्युत पुरवठा दिला नसेल तर त्याचे कार्य चालणारा नाही. 

समर्थन - संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधणाला विद्युत पुरवठा दिल्याशिवाय त्याचे कार्य सुरू होणार नाही. म्हणून संगणकालाही विद्युत पुरवठा देणे आवश्यक आहे. 


2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा. 

उत्तर :

i) माहिती संप्रेषणामुळे विज्ञानातील काही प्रयोग तसेच संकल्पना, सम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणें आणि सहजतेने निर्देशीत केले जातात. उदा. चेतासंस्था कार्य. 

ii) धोकादायक आणि महागडै वैज्ञानिक प्रयोग संगणकावरील सिम्युलेशनचा वापर करून अधिक सुरक्षित वातावरणात आणि कमी खर्चात करता येतात. 

iii) फ्लाईट सिम्युलेटरचा वापर वैमानिकांना प्रशिक्षण देताना केला जातो. त्यामुळे विमानावर ताबा ठेवणे, प्रत्यक्ष आणीबाणीची परिस्थिती निर्माण न करताही आणीबाणीच्या वेळी कमीत कमी जीवित आणि मालमत्ता हानी होईल अशा पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थी वैमानिकांना आत्मसात करता येते. 

iv) वैद्यकीय शिक्षणातही प्रत्यक्ष रुग्णावर प्रयोग करून त्याचा जीव धोक्यात न आणता अवघड शस्त्रक्रिया करायला शिकणे, त्याचा सराव करणे विदयार्थ्यांना सिम्युलेशनमुळे शक्य होते. 

v) स्फोटक पदार्थांच्या चाचण्या प्रत्यक्ष स्फोट न घडवता घेता येणे आणि त्याचे परिणाम अभ्यासणे सिम्युलेशनमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांवर घेण्यात येणाऱ्या औषधांच्या चाचण्या नैतिक बंधने पाळून आणि त्यांच्या जीविताला कमीतकमी धोका पोहोचेल अशा पद्धतीने घेता येणे नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य होते. 

vi) तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. उदा. हवामानशास्त्र 

vii) इंटरनेट, ईमेल, न्युजग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकीपिडीया, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इत्यादी शास्त्रीय माहिती गोळा करता येते.


आ. संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला ? कशाप्रकारे ?

उत्तर :

i) विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर खूप प्रभावीपणे केला जावू शकतो. 

ii) विज्ञानातील काही प्रयोग, तसेच संकल्पना, सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशीत केले जातात. उदा. चेतासंस्थेचे कार्य. 

iii) माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. 

iv) यासाठी माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल, माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा वापर झाला.


इ. संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते ?

उत्तर :

संगणकाचे कार्य पुढील पद्धतीने चालते i) इनपूट युनिट → ii) प्रोसेसिंग युनिट iii) आऊटपुट युनिट. 

 i) इनपूट युनिट - संगणकास सर्व प्रकारची माहिती या युनिटद्वारे पुरविली जाते.

ii) प्रोसेसिंग युनिट- इनपुट युनिटद्वारे पुरविलेल्या माहितीवर सी.पी.यू. मध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो.

iii) आऊटपुट युनिट- सर्व प्रक्रिया झाल्यावर तयार झालेले उत्तर नंतर आऊटपुट युनिटकडे पाठविले जाते. ते वापरकर्त्याला मिळते.


ई. संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

उत्तर :

संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

i) संगणकाचे सॉफ्टवेअर अधिकृत असावे. 

ii) अनाधिकृत सॉफ्टवेअर वापर करू नये. 

iii) अधिकृत माहितीच ॲक्सेस करावी. कोणाचीही डॉक्यूमेंट फाईल त्याच्या परवानगीशिवाय ॲक्सेस करू नये. 

iv) अधिकृत सॉफ्टवेअरच खरेदी करावे. 

v) सायबर कायदाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. 


उ. माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत ? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो ?

उत्तर :

माहिती संप्रेषणाची साधने - दूरदर्शन, दूरध्वनी, संगणक, इंटरनेट, ई-मेल, रेडिओ, व्हिडिओ कॉन्फरसिंग ही माहिती संप्रेषणाची साधने आहोत 

विज्ञानाच्या संदर्भात माहिती संप्रेषणाचा वापर - i) दूरदर्शन वरून विज्ञानविषयक माहिती संकलित करता येते. जसे ॲनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, सायन्स, नॅशनल जिऑग्राफी या वाहिन्यांवरून मिळालेली माहिती. 

ii) इंटरनेटच्या माध्यमातून विज्ञानविषयक माहिती मिळवता येते. विज्ञानातील प्रयोग संकल्पना व चित्रे हे इंटरनेटवरून घेता येते. 

iii) भ्रमणध्वनीद्वारे (मोबाइल) आपल्याला विज्ञानविषयक माहितीचे आदान-प्रदान करता येते. विज्ञानविषयक व्याख्याने, शैक्षणिक कार्यक्रमाचे व्हिडियो करून पुन्हा बघता येतात. 

iv) संगणकाद्वारे विज्ञानविषयक माहिती साठवून ठेवता येते. संगणकाद्वारे विज्ञानाचे प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण करता येते.


3. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र. 4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर- काल आलेख spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल. 

उत्तर :

अमर, अकबर, ॲन्थनी यांच्या गतीच्या अंतर -काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढतांना पुढील पायऱ्यांनी जावे लागेल. 

i) Desktop वरील Icon वर Click करावे.

ii) File tab मधील New हे Option निवडून Blank document हा पर्याय निवडायचा. 

iii) त्या टेबलमध्ये आवश्यक ती माहिती भरायची. 

iv) Insert tab मधील योग्य Graph वर Click करून Select केलेली माहिती Click करावी.


4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे ?

उत्तर :

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात येतात.

i) संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये व्हॉल्वज वापरले होते. हे व्हॉल्वज आकाराने मोठे होते व त्यांना वीजही खूप लागायची त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि पुष्कळदा संगणक बंद पडत असे. 

ii) संगणकाची दुसरी पिढी - 1959 ते 1993 दरम्यानची - ट्रान्झीस्टर्स 

iii) संगणकाची तिसरी पिढी - 1964 ते 1971 इंटिग्रेटेड सर्किट्स 

iv) संगणकाची चौथी पिढी - 1972 ते 2010 मायक्रोप्रोसेसर 

v) आजचे संगणक हे संगणकाच्या पाचव्या पिढीतले संगणक आहे.


5. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल. 

उत्तर :

आमच्या जवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी आम्ही खालील  माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ

i) संगणक/लॅपटॉप 

ii) मोबाईल 

iii) रेडीओ/टेलिग्रॉम 

iv) दूरदर्शन

v) ई-मेल


6. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint presentation तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा. 

उत्तर :

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून Power Point Presentation तयार करतांना -

i) सर्वप्रथम ज्या घटकावर Power Point Presentation बनवावयाचे आहे त्यासंबंधी सर्व मजकूर, चित्रे गोळा केली. 

ii) File tab, New Slide, Blank Slide Insert, Design tab इत्यादी संबंधी माहिती करून घेतली. 

iii) Animation tab च्या साहाय्याने Slide ला ॲनिमेशन दिले. 

iv) Slide Show करून खात्री करून घेतली.


7. संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

उत्तर :

संगणकाचा वापर करतांना संगणक चालू बंद करण्यापासून तर Software चा वापर करण्यापर्यंत प्रत्येक वेळी अडचणी येत गेल्या. प्रत्येक वेळी मात्र काही अडचणी वाचून, समजावून घेऊन, वापरून सुटत गेल्या त्यापैकी खालील प्रमाणे आहेत -

i) कधी कधी संगणक वापरतांना अडचण आली तर हार्डवेअरची मदत घ्यावी लागली. 

ii) कधी कधी काही Software application मध्ये अडचण येते. योग्य प्रकारे सुरू वा बंद न केल्यामुळे येणारी ही अडचण आहे. 

iii) संगणकाचा वापर करतांना अनेक वायर एकमेकांत गुंतलेले दिसतात, ते नीट काळजीपूर्वक पाहूनच सुरू करावे अन्यथा संगणकाचे नुकसान होवू शकते. 

iv) शक्यतोवर कोणतीही application सुरूच ठेऊन संगणक बंद करू नये.

Previous Post Next Post