वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल


प्रश्न. 1. फरक स्पष्ट करा. 

1) लोहमार्ग व रस्तेमार्ग

 लोहमार्ग 

 रस्तेमार्ग

 i) लोहमार्ग बांधणीसाठी रस्ते मार्ग बांधणीपेक्षा जास्त खर्च लागतो. 

ii) लोहमार्गावरील गाड्यांचा वेग रस्त्यांपेक्षा अधिक असल्याने दूरच्या अंतरावर ही वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडते. 

iii) एकाच वेळी जास्त माल व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असल्याने वाहतूक खर्च कमी येतो. 

 i) रस्ते बांधणीसाठी लोहमार्ग बांधणीपेक्षा कमी खर्च येतो. 

ii) लोहमार्गाची तुलना करता रस्ते वाहतूक ही दूरच्या अंतरावर वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 

iii) रस्त्यांवरील वाहनांची प्रवासी वा मालाच्या वाहतुकीची क्षमता कमी असते.  


2) वाहतूक व संदेशवहन

 वाहतूक

 संदेशवहन

 i) वस्तू किंवा व्यक्तीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थानांतर म्हणजे वाहतूक होय. 

ii) वाहतूक मार्गामुळे आपल्या देशातील लोक आणि परदेशीय लोक संपर्कात येतात. 

iii) दुष्काळ, भूकंप, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तसेच राष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे मार्ग महत्वाचे ठरतात. 

 i) व्यक्ती-व्यक्ती किंवा समूह यांचा परस्परांशी साधला जाणारा संपर्क किंवा विचारांची देवाण-घेवाण ज्ञान, माहिती किंवा तंत्र यांचे संक्रमण म्हणजे संदेशवहन होय. 

ii) आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम तार विभाग करतात.  


3) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने

 पारंपरिक संदेशवहनाची साध

 आधुनिक संदेशवहनाची साधने

 i) पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी प्राणी, पक्षी, मानव यांच्या माध्यमांमार्फत संदेश वहन केल्या जात असे. त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या वेगाला मर्यादा आहेत. 

iii) उदा. आरोळी किंवा दवंडी, आग किंवा संकेत वर हावभाव, वाद्ये वाजविणे किंवा ध्वज पताका फडकविणे, कबुतर, प्राणी, दूत, जहाज, रेल्वे, मोटारी ही पारंपरिक संदेशवहनाची साधने आहेत.   

 i) उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी साधने विकसित झाली. या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक संदेशवहन साधनांच्या वेगळा मर्यादा नाहीत. 

iii) उदा. टपालसेवा, तार, दूरध्वनी, सागरी तारा, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, दुरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा, टेलिफोन, टेलिग्राफएलसिड, लॅपटॉप, व्हिडिओ-ऑडिओ टेप, सिनेमा, मोबाईल, टेलेक्स, उपग्रह, इंटरनेट इ. आधुनिक संदेशवहनाची साधने आहेत.       

  

प्रश्न. 2. सविस्तर उत्तरे लिहा. 

1) वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा. 

उत्तर :

वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे पुढील माहितीवरून पष्ट करता येते. 

i) वर्तमानपत्रांवरून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. यामुळे संदेशवहनाचे कार्य होते. 

ii) वर्तमानपत्रांमधून महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या निघतात. त्यातून आपणांस वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. हे एक प्रकारचे संदेशवहन आहे. 

iii) कोणी बेपत्ता झाले किंवा हरवले याची माहिती वृत्तपत्रातून मिळते.


2) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

i) टीव्हीमुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. 

ii) टीव्हीद्वारे घर बसल्या देशविदेशातील घडामोडी माहिती करून घेऊ शकतो. 

iii) कोणत्या ठिकाणी काय चालले आहे याची माहिती घरबसल्या मिळत असल्यामुळे आपण त्याविषयी जागृक असतो. 

iv) उदा. कुठे भुकंप आला असेल व आपल्या ओळखीची व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर आपण संदेशवहनाद्वारे तिच्याशी संपर्क साधू शकतो. या संदेशवहनाच्या साधनासाठी खर्च कमी लागतो. अशा प्रकारे टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.


3) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?

उत्तर :

भ्रमणध्वनीचा वापर आज जवळपास ९९% लोक करतात. याद्वारे संदेशवहन करणे फार सोपे झाले आहे. संदेशवहनासाठी व्हॉटस्अप,फेसबुक, चॅट, कॉल इत्यादी अँप्सचा उपयोग करून आपण संदेशवहन करू शकतो.


प्रश्न. 3. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

1) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे. 

उत्तर :

विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे - मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी. 


2) टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा. 

उत्तर :

टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा - i) पत्रे, पाकिटे, पार्सले, पैसे टपालमार्गे अल्प दरात पोहोचविण्याची सोय टपाल कार्यालयातून होते. 

ii) तसेच अत्यंत कमी वेळात पत्रे पोहोचण्यासाठी 'स्पीड पोस्ट' योजना मोठ्या शहरांत सुरू आहेत. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम टपाल कार्यालयातून तार विभाग करते. 


3) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. 

उत्तर :

परिसरातील राष्ट्रीय महामार्ग - नागपूर - बैतूल, नागपूर-अमरावती, नागपूर-जबलपूर, नागपूर-रायपूर. 


4) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. 

उत्तर :

महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे - ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत डहाणू, चिंचणी, तारापूर, माहिम, दातिवरे, वसई, भाईदर, ठाणे व कल्याण. 

रायगड जिल्हा - मोरे, करंजे, रेवस, मांडवे, धरमतर, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, राजपुरी, श्रीवर्धन. 

रत्नागिरी जिल्हा - रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट, हर्णे, दाभोळ, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पूर्णगड इत्यादी. 

सिंधुदुर्ग जिल्हा - विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला व रेडी ही महत्वाची बंदरे आहेत.  


प्रश्न. 4. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. 

 'अ' गट 

'ब' गट  

'क' गट 

 टपालसेवा

रस्तेमार्ग 

माहितीचे आदान-प्रदान 

 शिवनेरी

संगणक जोडणीचे जागतिक जाळे  

स्पीटपोस्ट

 आंतरजाल 

लोहमार्ग  

आरामदायी प्रवास 

 रो-रो वाहतूक 

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत  

इंधन, वेळ व श्रमाची बचत 


उत्तर :


 'अ' गट 

'ब' गट  

'क' गट 

 टपालसेवा

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत 

स्पीटपोस्ट

 शिवनेरी

रस्तेमार्ग  

आरामदायी प्रवास

 आंतरजाल 

संगणक जोडणीचे जागतिक जाळे

माहितीचे आदान-प्रदान

 रो-रो वाहतूक 

लोहमार्ग

इंधन, वेळ व श्रमाची बचत 

Previous Post Next Post