जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.

उत्तर - 

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे पुढील प्रमाणे सांगता येतील.

i) जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. त्यापैकी सध्या 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. 

ii) भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500 हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. 

iii) जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत.

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे - भारतात जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे तीन आहेत. (i) पूर्व हिमालय (ii) सह्याद्री किंवा पश्चिम घाट (iii) अंदमान व निकोबार बेटे.

तसेच भारतात एकूण दहा जैवभौगोलिक विभाग करण्यात आले आहेत.

(i) हिमालयाच्या पलीकडील (ii) हिमालयीन (iii) भारतीय वाळवंट (iv) कमी पर्जन्याचे प्रदेश (v) पश्चिम घाट (vi) दख्खनचे पठार (vii) गंगेचे मैदान (viii) ईशान्य भारत (ix) भारतीय बेटे (x) किनारी प्रदेश. 

Previous Post Next Post