प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत ? त्यांना कसे वाचविता येईल

प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत ? त्यांना कसे वाचविता येईल

प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत ? त्यांना कसे वाचविता येईल ?

उत्तर :

प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे

i) वाढते प्रदूषण, जंगलतोड तसेच जागतिक तापमानवाढीमुळे हवामान व रहिवासात लक्षणीय बदल झाल्याने, पृथ्वीवरील कित्येक जीवजंतू व वनस्पतींच्या प्रजाती वेगाने नष्ट होत आहेत. 

ii) पोषक आहाराची कमी, प्रचंड प्रमाणात शिकार आणि शोषण तसेच मानवी ढवळाढवळीमुळे पसरणारे विषाणू यामुळे देखील पृथ्वीवरील प्रजाती नाश पावत आहेत. 

iii) मानवाच्या चहू दिशांनी होणाऱ्या अतिक्रमणामुळे इतर प्रजातींचा रहिवास घटत आहे. 

iv) प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती टिकवण्यासाठी खालील उपाययोजना करणे फायदेकारक ठरेल.

जैवविविधतेचे संवर्धन - i) दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 

ii) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 

iii) काही क्षेत्रे 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे. 

iv) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खा प्रकल्प सुरू करणे. 

v) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 

vi) कायदया पालन करणे. 

vii) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.

Previous Post Next Post