आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता दहावी

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय दहावी


प्रश्न. 1. तक्ता पूर्ण करा. 

(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड,आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)

 आपत्ती 

लक्षणे  

परिणाम  

उपाययोजना 

 वाहन अपघात 

गाडीचे ब्रेक फेल होणे, वाहन वेगाने चालवणे, रहदारीचे नियम न पाळणे, मद्य पान करून वाहन चालविणे.  

शरीराला इजा होणे, अस्थिभंग होणे, कधी कधी जीव गमवावा लागतो.   

रहदारीचे नियम पाळणे, हेलमेटचा वापर करणे, वाहन नियंत्रित वेगाने चालविणे.   

 दरड कोसळणे

मोठ्या प्रमाणात झालेली जंगल तोड, झाडांची मूळ डोंगराची माती घट्ट धरून ठेवतात. परंतु झाडं तोडल्याने आणि सततच्या पावसाने माती सैल होते आणि ढिगारे दरडीच्या स्वरूपात खाली कोसळतात. तसेच डोंगर  फोडल्यासाठी सुरंग लावणे. 

 मानवहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. 

डोंगराळ भागात वृक्षतोडीवर बंदी आणणे, भरपूर प्रमाणात झाडांची लागवड करणे, डोंगराळ भागात सुरुंग न लावणे. आपग्रस्त लोकांना मदत करणे.   

वणवा 

आकाशातून पडणारी वीज, उन्हाळ्यांतील उष्णतेने कोरडी पाने व गवत पेटल्याने, मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणामुळे, गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायुमुळे तसेच वैयक्तिक स्वार्थ.  

नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 

वनविभागाने जंगलाचे नियमित निरीक्षण करणे.   

चोरी 

दाराचे कुलूप तोडलेले असणे, घरातील सामान पसरलेले दिसते.  

घरातील किमती सामान, सोने, चांदी, पैसे चोरीला जाणे, घरातील सामान अस्ताव्यस्त होणे, क्वचित प्रसंगी जीवाला धोका होणे.  

घरातील माहिती दुसऱ्यांना न सांगणे, घरातील सर्वच कुटुंब बाहेर न जाता कोणी तरी एखादी व्यक्ती घरी असणे. परिसरात शंका असलेली व्यक्ती आढळल्यास पोलिसांना सूचना देणे.  

 दंगल 

उत्तरेजनात्मक वक्तव्य, धार्मिक वाद, अफवा राजकीय संघर्ष.  

जाळपोळ करणे, भांडण, तंटे, सार्वजनिक साधनसंपत्तीचे नुकसान अशांततेचे वातावरण. 

उत्तेजनात्मक वक्तव्य करू नये, धार्मिक गोष्टीवर वाद करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये. सत्य जाणण्याचा प्रयत्न करणे. 

युद्ध

परस्पर राष्ट्रातील चढाओढ, आंतरराष्ट्रीय स्पर्धा.  

युद्ध घडून येते, जीवित हानी व वित्तहानी होते. पर्यावरणाचा ऱ्हास होते. दहशतवाद निर्माण होऊन असुरक्षिततेची भावना वाढीस लागते.  

परराष्ट्र धोरण राबविणे, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे.  

रोगाची साथ 

घरातील जवळपास लोकांना आजार होणे, एकाचा आजार दुसऱ्याला होणे, भरपूर दिवस आजारी असणे.  

एकाबरोबर सर्वाना आजार होणे, आजाराचे मोठ्या आजारात रूपांतरण होणे, जीव जाणे.   

स्वत:ची काळजी घेणे, वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार करणे, स्वत:ची स्वच्छता राखणे.  

 पाणी टंचाई 

दुष्काळ, पर्यावरण असंतुलन.  

पाणी टंचाईमुळे शेतीचे नुकसान,पाण्यासाठी मनुष्य व प्राण्यांना,पक्ष्यांना भटकावे लागते. 

पावसाळ्यात 'पाणी अडवा पाणी जिरवा' मोहिम राबविणे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, भरपूर झाडे लावणे. 

 टोळधाड 

कुरतडलेली वनस्पतींची पाने.   

पिकांचे नुकसान  

कीटकनाशकांची फवारणी करणे.    

 आर्थिक मंदी 

रुपयाचे मूल्य दर घसरणे, वस्तूंच्या किमती वाढणे.  

रोजगार उपलब्ध होत नाही. देशाची आर्थिक स्थिती ढासळते.  

आर्थिक स्थिरत्व निर्माण करणे.  

पूर 

नदी नाल्यांत साचलेला गाळ.  

मनुष्यहानी, वित्तहानी, संदेशवहन व्यवस्था बंद पडणे, दळणवळण व्यवस्था विस्कळीत होणे.   

नदी नाल्यांतील गाळ, कचरा काढणे, स्वच्छता राखणे.   

दुष्काळ 

पर्यावरणाचे असंतुलन, जंगलतोड.  

पाण्याची टंचाई.  

झाडे लावणे. 


प्रश्न. 2. टिपा लिहा. 

1) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

उत्तर :

i) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात शासकीय स्तरावर काम करते. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे काम अशी प्राधिकरणे करतात. यांच्या दुवारे आपत्ती आल्यावर करावयाचे नियंत्रण व त्यातून येणाऱ्या समस्यांचे निवारण हे कार्य चालते.

ii) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या कक्षेत निरनिराळ्या राज्यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे येतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, तर राज्य पातळीवर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खालोखाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे काम करतात.

iii) जिल्हाधिकारी हा त्या त्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो. त्याच्या खालोखाल तालुका आणि गाव पातळीवरील समित्या काम करतात. तालुक्याचा तहसीलदार तर गावचा सरपंच हे त्या त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. प्रत्येक पातळ सामाजिक संस्था आणि शास्त्रीय स्वरूपाचे संशोधन (उदा., हवामान खाते) करणाऱ्या संस्था मदत करतात.

iv) आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी जबाबदार असतो. समन्वयक, नियंत्रक आणि नियोजनकर्ता अशा सर्व भूमिकांतून ते आपत्ती निवारणाच्या वेळी कार्यरत असतात.


2) आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप

उत्तर :

i) आपत्ती टाळणे (आपत्तीपूर्व व्यवस्थापन) तसेच आपत्ती आल्याम आपत्तीला तोंड देणे (आपत्ती/आघातानंतरचे व्यवस्थापन) या दोन बाबी आपली व्यवस्थापनात येतात. या संपूर्ण कामात आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार केला जातो आणि त्यावर अनुसरून कृती आराखड तयार करतात. अशा सर्व कार्यांचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. 

ii) आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, प्रतिसाद, पुनरुत्थापन आणि पूर्ववतता अशा टप्प्यांत आपत्तीशी सामना केला जातो.

iii) आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते.

iv) सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण अवस्था अशा तीन टप्प्यांनी आपत्तीला तोंड दिले जाते. 


3) अभिरुप सराव

उत्तर :

i) अभिरूप सराव हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक साधन आहे. 

ii) कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात. यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहू शकतो. 

iii) आग लागणे या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचे अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अभिरूप पराव अनेक शाळांमधून घेतले जाते. यामध्ये आग विझविण्यासंदर्भात, मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात तसेच आगीच्या एखादया प्रभावाखाली येऊन कपडे पेट घेतलेल्या नागरिकाला कसे वाचवावे याबाबत काही महत्त्वाच्या कृती करून दाखविण्यात येतात. 

iv) पोलिस दल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील असे उपक्रम राबविण्यात येतात.


4) आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 

उत्तर :

i) भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्याचा देश आहे तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासाला मोठ्या प्रमाणात बाधक ठरते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 58 वर्षांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ( कायदा क्र. 53/2005) झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन या अतिशय महत्त्वाच्या विषयाला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले आहे. 

ii) भारतामधील आपत्ती व्यवस्थापनाची व्याप्ती 2005 पर्यंत फक्त तत्काळ मदत व पुनर्वसन कार्यापर्यंतच मर्यादित होती. परंतु आता आपत्तीव्यवस्थापन कायदयातील प्रकरण 1 कलम 2 (इ) नुसार आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी या बाबीसुद्धा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

iii) आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय, राज्य व जिल्हा या तीन पातळ्यांवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यकारी समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

iv) या कायद्यातील प्रकरण 10 मधील कलम 51 ते 58 मार्फत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध प्रकारचे गुन्हे व त्यावर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद आहे. 

v) या कायद्यात सामाजिक विषमतेला प्रतिबंध घालणारे धोरण अंतर्भूत आहे. 

vi) या कायद्याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.


प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा.

उत्तर :

i) जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष हा आपत्ती आल्यानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच स्थापित केला जातो.

ii) याच्या अंतर्गत आपत्तीसंदर्भात विविध आढावे आणि माहिती गोळा केली जाते.

iii) अतिरिक्त मदत घेण्यासाठी, तसेच संकटसमयी सतत पाठपुरावा करण्यासाठी स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याशी सतत संपर्क ठेवला जातो.

iv) जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राकडून जिल्ह्यातील स्वयंसेवक संघटनांना एकत्रित केले जाते. 

आपत्ती निवारणाच्या कामात त्यांना सहभागी केले जाते. निरनिराळ्या सूचना जाहीर करणे आणि त्यांचा उपयोग करणे ही जबाबदारी पाळली जाते.


2) दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. 

उत्तर :

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये अधिकच वाढ होत गेली. त्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 

i) कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. जसे की वाढती लोकसंख्या, त्यांच्या वाढत्या गरजा, त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या, त्याचे स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत आहे. 

ii) विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशा अनेक कारणांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते. 

iii) दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या बाबी देखील मानवी आपत्तीत वाढ करणारी महत्त्वाची कारणे आहेत. 

iv) विकसित देशांमध्ये कित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास अथवा वापरण्यास मनाई आहे. मात्र त्याच विषारी अथवा मानवाच्या -हासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनांचे उत्पादन मागास किंवा विकसनशील देशांमध्ये सर्रास केले जाते.


3) आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती

उत्तर :

आपत्ती लहान असो वा मोठी, अल्पकालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवित हानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. 

ii) जीवनावश्यक वस्तुंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. 

iii) आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. 

iv) आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. 

v) आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा झाल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे.


4) प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. 

उत्तर :

आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे जरुरीचे असते. प्रथमोपचार माहीत असतील, तर आपण एखादा व्यक्तीचे अशा वेळी प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्या वगांतील मित्र-मैत्रिणों, घरातील लोक, आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकतात. त्यांना इजा होते कि त्यांच्या जिवावरही बेतते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांच्या दृष्टीने फायदयाचे होते, म्हणून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.


5) आपद्ग्रस्ताचे/ रुग्णाचे वहन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात ? का ?

उत्तर :

आपद्ग्रस्ताची/रुग्णांची शारीरिक स्थिती कशी आहे यानुसार वहन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ठरतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत. 

i) पाळणा पद्धत : मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यासाठी उपयुक्त पद्धत असते. 

ii) पाठुंगळीला मारणे : रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत असते.

iii) मानवी कुबडी पद्धत : एकाच पायाला जखम /मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे. 

iv) खेचून नेणे किंवा उचलून नेणे : बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असते.

v) चार हातांची बैठक : जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा ही पद्धत वापरली जाते. 

vi) दोन हातांची बैठक : जे रुग्णआधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात. त्यांच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 

vii) स्ट्रेचर : आपत्तीकाळात घाईगडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही, अशा वेळेस उपलब्ध वस्तुंचा जसे बांबू दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे.


प्रश्न. 4. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा. 

i) प्राथमिक शाळेतील मुले (विशेषत: 5-12 वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात. अशावेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना तयार करणे आवश्यक आहे. 

ii) शालेय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असतात. 

iii) समन्वयक या नात्याने समर्पक निर्देश देणे, अंमलबजावणी करणे आणि त्या अंमलबजवणीचा व त्यामधून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे, नियंत्रण ठेवणे अशा सर्व कामांसाठी योग्य नियोजन करण्याचे कार्य ते करतात. 

iv) सर्व प्रकारच्या आपत्तीसाठी आनुषंगिक योजना तयार करून तिला अनुमोदित करून घेणे ही जबाबदारी मुख्याध्यापकाची असते.     


प्रश्न. 5. तुम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा

उत्तर :

आम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींविषयींची माहिती पुढीलप्रमाणे आहेत. 

1) आग : आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग ही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकते.

कारणे : झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन जंगलात आग लागली. या आगीला वणवा असे म्हणतात.

परिणाम : शेती जंगलाला लागूनच असल्याने शेतीची अवजारे, इंधन (सरपण गोवऱ्या) यांचे नुकसान झाले. तसेच जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले.

उपाययोजना : सर्वप्रथम अग्निशमन दलास व पोलिसांना फोन करून बोलाविले. शेतातील विहिरीच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी माती टाकून आगीचा भडका कमी करण्याचा प्रयत्न केला. 

2) पूर : पूर ही निसर्गनिर्मित आपत्ती आहे. परंतु याला मानवही तितकाच जबाबदार आहे.

कारणे : नाल्यात अतिक्रमण,वाढता कचरा यामुळे नाल्याचे पात्र उथळा झाले. अतिवृष्टीमुळे नाल्यातील अतिरिक्त पाणी वाढून पूरस्थिती निर्माण झाली. 

परिणाम : पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी झाली. घरे, शासकीय कार्यालये, धान्य कोठार, बँक यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक सुविधा विस्कळीत झाली. 

उपाययोजना : पूर स्थितीतून बचाव करण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या मदतीने घरातील वृद्ध =, लहान मुले यांना घेऊन उंच जमिनीवर गेलो. वीजेच्या पाण्याशी जिथे संपर्क आला तिथे वीज प्रवाह बंद केला दक्षता विभागाला फोन करून मदत मिळविली. पूर स्थिती पूर्णपणे ओसारल्यानंतर नाल्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावली व त्यात परत कचरा जमा होणार नाही याची काळजी घेतली. 


प्रश्न. 6. तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल ? का ? 

उत्तर :

आमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात पुढील बाबी आम्ही तपासून पाहू:

i) शाळेचे फोन व्यवस्थित चालू आहेत का?

ii) शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रथमोपचार पेटी आहे किंवा नाही?

iii) शाळेत काही मूलभूत औषधे आहेत का? 

iv) लहान वर्गातील मुलांच्या मदतीला झटकन धावून जातील अशी टीम तयार आहे का ?

v) शाळेच्या प्रत्येक वर्गप्रतिनिधीने अभिरूप सरावात भाग घेतला आहे का? तो/ती प्रथमोपचार जाणतो / जाणते का?

vi) पालक प्रतिनिधींचा संपर्क माहीत आहे का ?

vii) शाळेत वैद्यकीय अधिकारी कधी हजर असतो ?

viii) शाळेत पुरेसे पिण्याचे पाणी आणि थोडा सुका खाऊ उपलब्ध असतो का?

ix) शाळेतील जिने व मार्गिका जलद दळणवळणासाठी मोकळे आहेत की नाहीत?


प्रश्न. 7. आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. 

1) दहशदवाद - मानवनिर्मित आपत्ती 

दहशतवादामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. अशांतता निर्माण होऊन राजकीय तसेच सामाजिक परिस्थिती ढासळते. दहशतवादामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याबरोबरच परस्पर राष्ट्रांमध्ये कलह निर्माण होतात. देशाची शांतता व सुव्यवस्था हालावते व प्रगतीस अडथडा निर्माण होतो. वादामध्ये जीवत सुटणाऱ्या व्यक्तीस मानसिक धक्काही बसतो.


2) जमिनीची धूप - निसर्गनिर्मित आपत्ती

जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या स्तरातच पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा साठा असतो. हा वरवरचा स्तरच धुपेने वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते व त्याचा विपरित परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो. वरच्या भागातील सुपिक जमिनीवर पसरतात व या सुपिक जमिनी निकामी होतात. धूप झाल्याने पाण्याबरोबर माती, गोटे इ. गगाळ वाहत येवून तो धरणांच्या जलाशयात व कालव्यात साठतो. त्यामुळे त्यांची पाणी साठविण्याची किंवा पाणी वाहन नेण्याची क्षमता कमी होते. यामुळे कालांतराने पाण्याची टंचाई निर्माण होते. गापुराच्या समस्या उद्भवतात व जमिनीचे विभाजन होते.


3) कावीळ - निसर्गानिर्मित आपत्ती

कावीळ हा विषाणुमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामामुळे होणारा रोग आहे. यामध्ये त्वचा आणि डोळ्यांमधील बाह्य पांढरा भाग रक्तातील से, पित्ताच प्रमाण वाढल्याने पिवळा दिसायला लागतो.


4) वणवा - निसर्गनिर्मित आपत्ती 

उष्णतेने व वाऱ्याने सुके गवत व झुडपे नैसर्गिकरित्याच पेट घेतात. अशा तऱ्हेने पसरणारा वणवा निमिषार्धात जैवविविधता नष्ट करू शकतो. नैसर्गिकरीत्या भडकलेले वणवे विझवणे कठीण असते. त्यामुळे अनेक झाडे, पशु-पक्षी व त्यांचे अधिवास आगीत जळून खाक होतात. धुरामुळे हवा प्रदूषित होते. 


5) दुष्काळ - निसर्गनिर्मित आपत्ती

दुष्काळ आल्यामुळे पाण्याची कमतरता होते. पाण्याच्या अभावी पिके करपून जातात. अन्न तुटवडा निर्माण होतो. गाई-गुरे पाण्याअभावी आणि चारा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात. स्थानिक लोकांना स्थलांतर करणे भाग पडते. 


6) चोरी - मानवनिर्मित आपत्ती 

चोरी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते. आपल्या कष्टाचे पैसे दागिने चोरीला गेल्यामुळे मानसिक धक्का बसतो. कधी कधी चोराकडून शारीरिक त्रासही दिला जातो. जिवावरही बेते. 

 

प्रश्न. 8. खाली काही चिन्हे दिली आहेत. त्याबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात ?

उत्तर :

 

 General Worming

सामान्य चेतावणी

 

 Toxic 

विषारी

 

 Health Haraed

आरोग्यास धोका 

 

 Corrosive

उपरोधिक

 

 General Worming 

ज्वालाग्राही साहित्य

 

 Explosive 

स्फोटक

 

 Hazardous to environment 

पर्यावरणाला धोका

 

 Oxidizing 

ऑक्सीडीकरण 

 

 Gas under pressure 

दडपणाखाली गॅस



दिलेल्या चिन्हे ही पर्यावरणीय सुरक्षा चिन्हे आहेत. ही चित्रे सामान्य चेतावणी, विषारी पदार्थ, आरोग्यास धोका, उपरोधिक, ज्वालाग्राही साहित्य, स्फोटक, पर्यावरणाला धोका, ऑक्सीडीकरण इत्यादी बाबी दर्शवितात. या सुरक्षा चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होण्याची परिपूर्ण संभावना असते. एका भागात धोकादायक परिस्थिती असल्यास तेथे ही सूचना फलके लावली जातात जेणेकरून तेथे कठलीही संकटस्थिती निर्माण होवू नये. या सूचनांचे उल्लंघन केल्यास भयंकर नुकसानाबरोबर जीवितहानी होते. जवळपासच्या ठिकाणापर्यंत अपघात होतो व प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होते.


प्रश्न. 9. असे का म्हणतात ते स्पष्ट करा. 

1) अभिरूप सराव (Mock drill) उपयुक्त असतो.

उत्तर :

i) अभिरूप सराव हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक प्रभावी साधन आहे. 

ii) कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. कधीही, कोणत्याही क्षणी येऊ शकते. अशावेळेस व्यक्ती सजग असणे फार आवश्यक आहे. 

iii) अभिरूप सरावामुळे कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. 

iv) त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अमलबजावणी यशस्वी होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहता येते. म्हणून अभिरूप सराव उपयुक्त असतो.


2) प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.

उत्तर :

i) पर्यावरणीय संकटे ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांच्या परस्परक्रियातून येत असतात. तसेच पूर, वावटळी, दुष्काळ, भूकंप, गीतलहर उष्णतेची लाट इ. चा सामना करताना भारताला बहुविध प्रकारे त्याकडे बघावे लागते. 

ii) त्यासाठी सातत्यपूर्ण नियोजन समन्वय आणि अंमलबजावणीची गरज असते. त्यासाठी धोका नियंत्रण, संकटाचा सामना आणि पूनर्वसन आणि पुनर्रचना करताना केलेले उपाय यांची आवशक्यता असते. 

iii) देशाला मजबूत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची गरज आहे. आपत्तीचा सामना करताना ताबडतोब सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या घटकांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यात दीर्घ मुदतीच्या पुनर्वसन धोरणाचा समावेश असावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करून त्याद्वारे प्रशिक्षण दिल्यास येणाऱ्या समस्यांना प्रभावीपणे तोंड देता येईल. 

iv) आपत्तीपूर्व व्यवस्थापनात प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे इत्यादीं बाबीं प्रभावी आपत्ती व्यवस्थापनात भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. 


प्रश्न. 10. खालील तक्ता पूर्ण करा. 

उत्तर :




प्रश्न. 11. खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढावल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल ?

 

 

या परिस्थितीत कुणाशीही वाद घालू नये. अशी परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला स्वत:चे संरक्षण करता आले पाहिजे. व ही आपत्ती झाल्यास लवकरात लवकर मार लागलेल्या ठिकाणी प्रथमोपचार करावा.  

 

 

या परिस्थितीत आपल्या घरचे गॅस चेक करत राहणे महत्वाचे आहे व अशी आपत्ती उद्भवल्यास त्वरित अग्निशामक दलात संपर्क करावा. 

 

 

या परिस्थितीत घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे मुख्य स्त्रोतापासून बंद करावीत. तसेच कोणत्याही झाडाखाली उभे राहू नये. अशा आपत्तीमधून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला पोहता येणे गरजेचे आहे.  

 

 

वादळाच्या परिस्थितीत कोणत्याही मोठ्या झाडाला अथवा भक्कम आधार असलेल्या वस्तूला घट्ट पकडून राहावे. तसेच डोळेबंद करावेत जेणेकरून डोळ्यांमध्ये काही पदार्थ जाऊन इजा होऊ नये. व आडोशाला उभे राहावे. 


Previous Post Next Post