युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
उत्तर :
युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले; कारण युरोपीय देशांचा आशियायी देशांशी खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, पण इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना व्यापार करणे अशक्य झाले. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.