प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला

प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला

प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 

उत्तर : 

प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला; कारण सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकत्याची वखार काबीज केली. या घटनेमुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर इंग्रज रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळविले. त्यानंतर इ.स. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रज सैन्य व सिराज उद्दौला यांची गाठ पडली; परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे सैन्य लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 

Previous Post Next Post