युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
उत्तर :
युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले; कारण युरोप व आशियाई देशांत व्यापारांचे पर्व सुरु झाले. नव्या सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. त्यांनी एकत्र येऊन भागभांडवलातून व्यापारी कंपन्या स्थापन केल्या, या व्यापारी कंपन्या खूप फायदेशीर होत्या. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होऊ लागली. म्हणून युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.