वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल


प्रश्न. 1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

उत्तर :

हे विधान योग्य आहे.

कारण - i) आलेख किंवा आकृत्याद्वारे दर्शविण्यात येणारी आकडेवारी नकाशा शिवायही दाखविता येते परंतु या आकडेवारीचे स्थानिक वितरण नकाशाद्वारे व्यक्त केले तर ते खऱ्या अर्थाने भौगालिक वितरण दर्शविते. 

ii) वितरणाच्या नकाशांमुळे भौगोलिक घटकांचा त्या स्थानिय वितरणावर कसा परिणाम झाला आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणून वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.


2. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण. - i) या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. 

ii) हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. 

iii) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जाते. त्यासाठी त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 


3. क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

कारण - i) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात. 

ii) प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. 

iii) ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. म्हणजेच क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात.


4. क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

उत्तर : 

हे विधान अयोग्य आहे . 

कारण - i) क्षेत्रघनी नकाशा लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी वापरतात. 

ii) तर समघनी नकाशा उंची दाखविण्यासाठी वापरतात. 

iii) समधनी नकाशात उंची दाखविण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. तर क्षेत्रघनी नकाशात रंगछटांचा उपयोग केला जातो.


5. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. 

कारण - i) दिलेल्या भौगोलिक घटकाच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशात संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते. 

ii) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे व कोणत्या प्रदेशात कमी आहे याचे नकाशावरून सहज ज्ञान होते.


6. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण - टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते. म्हणून टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक योग्य प्रमाण असावे.


7. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

कारण - समघनी नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जातात. 

i) समघनी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते. 

ii) ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजेच यावरून हे सिद्ध होते की समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करतात.


8. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. कारण 

i) क्षेत्रघनी नकाशा पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही 
सहज समजते. 

ii) एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात.


प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. 


उत्तर : 

वितरणाच्या नकाशांचे उपयोग - i) प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करणे. 

ii) घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो.

वितरणाच्या नकाशाचे प्रकार -

i) टिंब पद्धत 

ii) क्षेत्रघनी पद्धत 

iii) समधनी पद्धत


2. समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक

उत्तर :

 समघनी पद्धत 

 क्षेत्रघनी पद्धत

 

i) समघनी पद्धतीतील क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. 

ii) समघनी नकाशे तयार करण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. 

iv) प्रदेशाची उंची, तापमान पर्जन्य दाखविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. 

 

 

i) क्षेत्रघनी पद्धतीत प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. 

ii) क्षेत्रघनी नकाशांसाठी एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. 

iii) रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध हे वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात. 

iv) लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 


3. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत उपयुक्त असते.

कारण - 

i) टिंब पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे. 

ii) या पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही सहज समजते. कारण एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात. 

iii) एका टिबांची ठराविक किंमत असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील टिंबाची संख्या मोजून घटकाचे संख्यात्मक मूल्य काढता येते. 

iv) सामान्य माणसाला हा नकाशा सहज समजतो.


प्रश्न. 3. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल ? 

1) जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत


2) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत


3) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. 

उत्तर :

टिंब नकाशा पद्धत


4) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. 

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत


5) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत. 


प्रश्न. 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 


1) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे ?

उत्तर :

 जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. 


2) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. 

उत्तर :

दिशाच्या संदर्भात उत्तर व पूर्व दिशेत लोकसंख्येचे वितरण दाट आहे. तर पश्चिम दिशेत लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. 


3) सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ? ते ठिकाण कोणते ?

उत्तर :

सर्वात मोठा गोल कोल्हापूर (करवीर तालुका) या ठिकाणी आहे. त्याची लोकसंख्या वीस लाख इतकी आहे. 


4) सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

उत्तर :

सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा हा आहे.  

Previous Post Next Post