स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते
उत्तर :
कारण i) पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते..
ii) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा २४ तासांचा कालावधी होय.
iii) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जस जसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वांत कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वांत लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते.
iv) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.