१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा.
उत्तर :
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत -
i) ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली : कंपनीच्या कारभारामुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे १८५७ च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही, असे वाटल्यामुळे १८५८ साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
ii) राणीचा जाहीरनामा : इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा काढला. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही, भारतीयांच्या धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही दिली.
iii) भारतीय लष्कराची पुनर्रचना : लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली.