१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ?
उत्तर :
भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही, अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील, हे धोरण राबवले जाऊ लागले. 'फोडा आणि राज्य करा' हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले.