१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले ?
उत्तर :
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश आले; कारण -
i) लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती, तरीही राजपूताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले.
ii) लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्त्व निर्माण होऊ शकले नाही.
iii) राजे-रजवाड्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला नाही, ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.
iv) भारतीय सैन्याला शौर्यापेक्षा डावपेचांची जास्त गरज होती; कारण इंग्रजांकडे आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी मोठ्या प्रमाणात होते.
v) इंग्रजी सैन्याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल होती.