संकल्पना स्पष्ट करा भांडवलशाही
उत्तर :
उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असणे म्हणजे भांडवलशाही होय. कमाल नफा मिळविणे हा भांडवलशाहीचा हेतू असतो. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापारांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे एकत्र येऊन त्यांनी भाग-भांडवलात कंपन्या स्थापन केल्या. पौर्वात्त्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारामुळे धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.