संकल्पना स्पष्ट करा प्रबोधन युग
उत्तर :
युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच १३ वे ते १६ वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या काळात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटकांमुळे आधुनिकतेला सुरुवात झाली. म्हणूनच या काळाला 'प्रबोधन युग' म्हणतात.
प्रबोधन युगात ग्रीक व रोमन यांच्यात कला, स्थापत्य व तत्त्वज्ञान या क्षेत्रांत पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच मानवतावाद, माणसाची सर्वांगीण प्रगती, माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विचारांना चालना मिळाली.