भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
उत्तर :
ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली त्यामुळे भारतीयांना या पद्धतीचा परिचय झाला. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल करून विचार-विनिमय करून या शासनपद्धतीचा अवलंब केला.