भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय इयत्ता नववी


प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) अणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ............... हा होता. 

अ) लष्करी क्षमता निर्माण करणे

ब) अणुचाचणी करणे

क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे

ड) ऊर्जेची निर्मिती

उत्तर :

अणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती हा होता.


2) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट ................ बनले आहे. 

अ) आण्विक विकास 

ब) आर्थिक विकास 

क) अणुचाचणी 

ड) सुरक्षा व्यवस्था

उत्तर :

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास बनले आहे. 


3) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. 

अ) मुक्त आर्थिक धोरण 

ब) परस्परावलंबन

क) अलिप्ततावाद

ड) आण्विक विकास

उत्तर :

आण्विक विकास


4) इ. स. १९७४ साली भारताने .............. या ठिकाणी अणुचाचणी केली. 

अ) श्रीहरीकोटा 

ब) थुंबा

क) पोखरण

ड) जैतापूर

उत्तर :

इ. स. १९७४ साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. 


प्रश्न. 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

कारण - i) पं. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. 

ii) भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. 

iii) आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले.


2) अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास जाता पुढाकार घेतला. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

कारण - अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या पदांवरील व्यक्ती करतात. त्यावेळी या पदावर अटलबिहारी वाजपेयी होते.


प्रश्न. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) भारताचे परराष्ट्र धोरण

उत्तर :

i) भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. 

ii) भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम ५१ नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. 

iii) त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. 

iv) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. या चौकटीत भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे.


2) राष्ट्रीयहितसंबंध

उत्तर :

i) राष्ट्रीयहितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय. 

ii) आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. 

iii) या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. 

अ) आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. 

ब) आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.


3) जागतिक शांतता 

उत्तर :

i) आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते. जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठीही जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे स्पष्ट मत होते. याच कारणामुळे भारताने सुरुवातीपासूनच जागतिक शांततेचा पुरस्कार केला. तसेच आपल्या परराष्ट्रीय धोरणात शांती प्रयत्नांना महत्त्वाचे स्थान दिले. 

ii) जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे भारत कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही. याशिवाय जगात कोठेही युद्ध सुरू झाल्यास ते तात्काळ थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न केले. 

iii) जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त, कोरियास, व्हिएतनाम आणि इंडोचायना तसेच इराण, इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले. पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला. आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला. यांवरून भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते.


प्रश्न. 4. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते ?

उत्तर :

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे. 

i) आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणुबॉम्ब बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतही क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे. 

ii) वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल या भितीने आपआपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरु झालेली आहे. यामुळे जागतिक शांतता भंग होत आहे. 

iii) आज जगातील अनेक देशांनी अणुबॉम्ब व अण्वस्त्र सज्जतेमुळे महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे दररोज जगातील कोणत्या ना कोणत्या देशात आतंकी हमले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनता आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. या सर्वामुळे जागतिक शांततेस धोक निर्माण झाला आहे. 

iv) अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक आतंकवाद वाढण्यास खत-पाणी मिळाले आहे. देशातील असुरक्षिततेची भावनाही जागतिक आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठस्त आहे. देशातील जागतिक आतंकवादामुळे ही जागतिक शांतता नष्ट होत आहे. 

v) अण्वस्त्र सज्जता असलेली शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर जागतिक शांतता निर्माण करु शकतात. पण ती दीर्घकाळ टिकत नाही.

या सर्व चर्चेवरून अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट होते.


प्रश्न ५ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे ? 

उत्तर :

i) भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते. 

ii) भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे. 

iii) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व हे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. 


2) भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले ?

उत्तर :

भारत व चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने १९९० मध्ये पुढाकार घेतला. भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले. 

i) भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये चीनला भेट दिली. 

ii) भारताचे पंतप्रधान श्री. नरसिंहराव यांनी इ.स. १९९३ मध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले. 

iii) पुढे श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. 

iv) तसेच जानेवारी २००१ मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किपेंग यांनीही भारताला भेट दिली. या सर्वांनी भारत-चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले.


३) भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा.

उत्तर :

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायदयाचा आदर करणे. 

ii) शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे.

iii) भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. 

iv) दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. 

v) भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे.


प्रश्न. 6. पुढील संकल्पनाचित्र तयार करा. 

उत्तर :



Previous Post Next Post