संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते

संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते

संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते ?

उत्तर : 

संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. हे नियंत्रणाचे मार्ग पुढीलप्रमाणे - -

चर्चा व विचारविनिमय : कायद्याच्या निर्मितीदरम्यान त्यावर संसद चर्चा व विचारविनिमय करतात व मंत्रिमंडळाला धोरणातील त्रुटी किंवा दोष दाखवून देतात. त्यामुळे कायदा निर्दोष होण्यास मदत होते.

प्रश्नोत्तरे : संसदेच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने होते. संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे.

शून्य प्रहर : अधिवेशन काळात दुपारी १२ चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते.

अविश्वास ठराव : लोकसभेत बहुमत असेपर्यंत सरकार काम करते. संसद सदस्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास विरोधी पक्ष अविश्वास ठराव मांडू शकतात. तो बहुमताने मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अशा प्रकारे संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते.

Previous Post Next Post