दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा.

उत्तर :

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये अधिकच वाढ होत गेली. त्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 

i) कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. जसे की वाढती लोकसंख्या, त्यांच्या वाढत्या गरजा, त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या, त्याचे स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत आहे. 

ii) विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशा अनेक कारणांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते. 

iii) दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या बाबी देखील मानवी आपत्तीत वाढ करणारी महत्त्वाची कारणे आहेत. 

iv) विकसित देशांमध्ये कित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास अथवा वापरण्यास मनाई आहे. मात्र त्याच विषारी अथवा मानवाच्या -हासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनांचे उत्पादन मागास किंवा विकसनशील देशांमध्ये सर्रास केले जाते.

Previous Post Next Post