ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते
उत्तर :
कारण i) देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते.
ii) जागतिक व्यवहाराच्यादृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे.
iii) ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच ०° रेखावृत्त आहे म्हणून ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.