भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे ?
उत्तर :
i) भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते.
ii) भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे.
iii) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व हे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे.