माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा

माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा

माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा. 

उत्तर : 

इंग्लंडचे पंतप्रधान अँटली यांनी जून १९४८ पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल, असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांबरोबर विचारविनिमय केला आणि भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली.

या योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत व पाकिस्तान ही राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानांवरील ब्रिटिशांचे स्वामीत्व संपुष्टात येईल. अशी तरतूद करण्यात आली.

Previous Post Next Post