स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर : 

भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालिरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता; परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक या सुधारणा चळवळीत काही पुरुषांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे आले.

पंडिता रमाबाई यांनी 'आर्य महिला समाज' व 'शारदासदन' या संस्था स्थापन केल्या.

१९०४ मध्ये भारत महिला परिषद व १९२७ मध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स या संस्थांची स्थापना झाली. त्यामुळे हे कार्य राष्ट्रीय पातळीवर, जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इ. प्रश्नांबाबत स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रखमाबाई सावे या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या.

राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. १९३५ च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळात स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यानंतर स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आले.


Previous Post Next Post